मुंबई : आपल्याला हे माहित आहे की, दुधापासून दही बनवले जाते. परंतु बऱ्याच लोकांना गोड दही जेवणात खायला आवडते आणि मग जेव्हा दही आंबट होऊ लागतं तेव्हा आपल्यापैकी बरेच लोकं त्याला फेकून देतात. तर काही लोकं मग त्याचा ब्युटीप्रोडक्ट म्हणून वापर करतात. जसे की, हेअर मास्क.  जरी आंबट दही त्वचेसाठी किंवा केसांसाठी वापरणे चांगले आहे. परंतु आंबट दही खाण्यात वापरल्याने ते तुमची खाण्याची चव खराब करु शकते. परंतु तसे नाही योग्य पदार्थात तुम्ही दहीचा योग्य प्रकारे वापर केलात तर तुमचे दही आंबट झाले असले तरी तुम्ही ते जेवणातच वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, आपण दह्याचा आहारात नक्कीच समावेश करतो. दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, अशा परिस्थितीत जेव्हा ते आंबट होते तेव्हा ते खाणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत, आपण इच्छित असल्यास, आपण इतर पदार्थ बनविण्यासाठी वापरू शकता.


भटुरे


भटुरेसाठी जेव्हा आपण कणिक मळतो, तेव्हा त्याचा उपयोग परिणामकारक ठरतो. खरं तर जेव्हा आपण भटूरेसाठी कणिक तयार करतो तेव्हा त्यासाठी आंबट दही वापरतात. याने पीठ व्यवस्थित तयार होईल आणि भटुरा बनवला की तो फुगतो. म्हणजे पीठ मळताना अर्धी वाटी आंबट दही घातलं तर भटुरे अगदी बाजारात मिळतात तसे होतात.


ढोकळा


बऱ्याचदा महिला जेव्हा ढोकळा बनवतात, तेव्हा तो फुगत नाही. म्हणून मग महिला नाराज होतात. परंतु हे लक्षात घ्या की, तुम्हाला मऊ आणि फुगलेला ढोकळा हवा असेल, तर आंबट दहीच वापरा. तो ढोकळ्याची चव वाढवतो. ढोकळा पीठ तयार करण्यासाठी, दही आणि बेसन 2:1 च्या प्रमाणात मिसळा, नंतर चवीनुसार मीठ घाला.


चटणी


जेवणात आपल्याचा तिखत, आंबट गोड चटणी मिळाली तर आपल्याला भाजीची देखील गरज लागत नाही. आंबट दह्यापासून स्वादिष्ट चटणी बनवली जाते. लसूण आणि मिरचीची पेस्ट घ्या, त्यात आंबट दही मिसळा, नंतर चवीनुसार मीठ मिसळा, परंतु लक्षात ठेवा दही खूप पातळ किंवा घट्ट नसावे.


डोसा


लोकं अनेकदा घरी डोसे बनवतात, त्यामुळे या पीठात तुम्ही आंबट दही मिसळू शकता. डोसा पिठात बनवण्यापूर्वी तांदूळ पाण्याने धुवून दह्यात मिसळून त्यात मेथीचे दाणे मिसळा. नंतर 3 तास ठेवा. मग बारीक करूनही त्यात थोडं दही घालून नीट फेटून घ्या, त्याचा मस्त डोसा होईल. हे पिठ आंबट करण्यात मदत करते. तसेच यामुळे डोस्याला चव देखील येते.