Yogart And Dahi: आरोग्यासाठी दही खूप फायदेशीर आहे. रोज दह्याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात. हल्ली बाजारात दह्याचेही वेगवेगळे प्रकार आले आहेत. अशातच एक म्हणजे योगर्ट. अनेकांचा योगर्ट म्हणजेच दही असा समज होतो. अशावेळी दही आणि योगर्ट यातील नेमका फरक काय, हे जाणून घेऊया. (what is the difference between yogart and dahi)


दह्याचा आणि योगर्टचा वापर नक्की काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दही आपण भातसोबतही खातो. कुठलेही पराठे (Dahi with Paratha) असतील किंवा आपले पारंपारिक आणि मराठी थालीपीठसारखे प्रकार अथवा थपलेही. अशा तऱ्हेच्या पदार्थांसोबत आपण दह्याचा वापर करतो. तर योगर्ट याकडे आपण डाएटच्या दृष्टीनेही पाहतो तर फळांसोबत, किंवा अगदी नुसतंही आपण योगर्ट खाऊ शकतो. 


दह्यात आणि योगर्टमध्ये कोणती पोषकतत्त्वे असतात? 


दह्यामध्ये कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस, व्हिटॅमिन-बी12 सारखे पोषक घटक असतात तर योगर्टमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम (Potassium) आणि व्हिटॅमिन-B6 सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे दोघांमधून आपल्याला चांगल्या प्रकारे पोषकतत्त्वे मिळतात. 


दह्यात आणि योगर्टमध्ये काय आहे फरक?


दही बनवण्याची प्रक्रिया ही नैसर्गिक असते तर योगर्ट हे आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम असते. आपण दुधात दही मिसळून त्याचं विरझण रात्रभर ठेवतो आणि दही बनवतो तर योगर्टमध्ये कोणताही आम्लयुक्त पदार्थ उदाहरणार्थ व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालूनही योगर्ट बनवले जाते. योगर्ट बनवण्याच्या प्रक्रियेत जीवाणू असतात. लॅक्टोबॅसिलस बल्गेरिकस (Lactobacillus bulgaricus) नावाचा जीवाणू यात असतो. योगर्ट बनवताच त्यात नाना तऱ्हेचे फ्लेवर घातले जातात. तर दही हे सामान्य चवीचे असते. दही आपण घरी बनवू शकतो परंतु योगर्ट मात्र घरी बनवता येत नाही त्यासाठी इंडस्ट्रियल फूड प्रोसेसिंगच करावे लागते. 


काय आहेत दह्याचे आणि योगर्टचे फायदे? 


योगर्टमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल (Chelostrol) सारख्या समस्या दूर होतात. दही हे फिटनेससाठी उत्तम आहे. त्याचसोबत त्यानं पचनाची समस्या दूर होते. दह्याचा वापर केसांच्या आरोग्यासाठीही होतो.