त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी किवी उपयुक्त...
किवी हे फळ खाण्यासाठी जितके उत्तम आहे तितकेच आरोग्यासाठीही.
नवी दिल्ली : किवी हे फळ खाण्यासाठी जितके उत्तम आहे तितकेच आरोग्यासाठीही. त्याचबरोबर ते सौंदर्यवर्धकही आहे. या छोट्याशा फळ अनेक पोषकतत्त्वे आहेत. व्हिटॉमिन, मिनरल्स आणि ओमेगा-3 अॅसिड हे या पोषकघटकांनीयुक्त अशा फळाचे फायदे जाणून घेऊया...
त्वचेसाठी उपयुक्त
त्वचा निरोगी आणि मुलायम ठेवण्यासाठी किवी उपयुक्त ठरतं. तसंच त्यात अॅंटी एजिंग गुणधर्मही आहेत. त्यामुळे किवीचा फेसपॅक त्वचेसाठी फार उपयुक्त ठरतो. पाहुया कसा तयार कराल किवीचा फेसपॅक...
१ चमचा किवी पावडरमध्ये चार थेंब बदाम तेल आणि अर्धा चमचा पीठ घालून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. चेहरा छान टवटवीत दिसेल.
किवीचे फळ आणि दही एकत्र करुन तयार केलेला फेसपॅक त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. किवीच्या फळाचे लहान लहान तुकडे करुन त्यात दही मिसळा आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. ही क्रिम कोणत्याही कॉस्मेटिक क्रिमपेक्षा चांगले काम करेल.
किवीचे फळ त्वचेचे सौंदर्य खुलवण्यास फायदेशीर ठरते. किवीच्या फळाची पेस्ट करून त्यात लिंबू रस मिसळून चेहऱ्यावर लावा. १० मिनीटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्वचेला तजेला येईल. किवीतील व्हिटॉमिन सी आणि ई मुळे त्वचा उजळेल.