खजूर खाण्याचे `हे` आहेत ५ फायदे
खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत.
नवी दिल्ली : थंडीच्या दिवसात तुम्ही खजूर खातं (Dates Fruit) असालचं. खजूर चवीला गोडं असतात आणि त्याच्या सेवनाचे शरीराला खूप फायदे देखील आहेत. यामध्ये खूप विटॅमिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये विटामिन, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आहे जे शरीरासाठी रामबाण औषध म्हणून काम करतो. मध्य पूर्वेपासून आफ्रीकी देशांपर्यंत खजूर सर्वांचे आवडते का आहेत ते जाणून घेऊया.
प्रोटीन (Protein) आणि विटामिनने(Vitamins)भरपूर असल्याने खजूर तुमचे वजन वाढवण्यास मदत करतात. तुम्ही खजूर तुपासोबत खाऊ शकता. खजूर खाणं हे शरीरातील वायु, कफ आणि पित्ताचं प्रमाण पाहून ठरवावं.
खजूरमध्ये आयर्नची मात्रा खूप असते. आयर्नची कमी मात्रा शरीरात त्रासाला कारणीभूत असते. ज्यामुळे छोटा श्वास, एनीमिया, दमणं अशी लक्षणं जाणवतात. रक्त स्वच्छ करण्यात देखील हे तुम्हाला मदत करतात.
खजूर हा संधिवातावर गुणकारी आहे. खजूरमध्ये असलेले मॅंगनीज, सेलेनियम, तांबे, मॅग्नेशियम सारखे घटक आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप प्रभावी आहेत.
जर तुम्ही रोज सकाळी पाण्यात भिजवलेले खजूर खात असाल तर त्यातील फायबर तुमचे पचन सुधारण्यास मदत करतील. कफाचा आजार असलेल्यांसाठी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.
खजूरमध्ये कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण कमी असते. यामुळे हृदय चांगले राहते. साखरेचे प्रमाण कमी असणं हे देखील फायदेशीर आहे. खजूर जगभरात सर्वात जास्त खाल्ल्या जाणाऱ्या फळांपैकी एक आहे.
आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.