मुंबई : इंटरनेटने जगाला एकत्र आणलय. यामुळे अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटत असले तरी काही गंभीर न सुटणारे प्रश्नही याच्या गैरवापरामुळे निर्माण झाले आहेत. सायबर सेक्स अॅडिक्शन याचाच एक भाग आहे. इंटरनेटवर सर्व काही सहज उपलब्ध होत असल तरी त्यातील काय निवडायच हे ठरवताना बहुसंख्य तरुणांची गल्लत होते. उत्सुकता म्हणून पॉर्न बघणाऱ्या अनेक तरुणांना यावर इंटरनेटवर अश्लील फोटो, व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागते. याचा परिणाम त्यांचा मेंदु आणि शरिरावर होत असतो.  आयुष्यातील खूप महत्त्वाचा बराच वेळ हे पाहण्यासाठी घालवला जातो. सामाजिक आणि घरगुती आयुष्यावर याचा परिणाम होत असतो. पण अशी माणसं ओळखायची कशी, नेमकी काय लक्षण असतात याबद्दल आपण आज जाणून घेऊया..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसं ओळखाल ?


१) इंटरनेट सेक्स अॅडीक्ट लोक नेहमी लैंगिक भावना चाळवणाऱ्या गोष्टी सर्च करत असतात. जर त्यांना हे उपलब्ध झाल नाही तर त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. 


२) सायबर सेक्स अॅडिक्ट लोक स्वत:ला असंतुष्ट समजतात. आभासी संबधांशी आपल्या वास्तविक जीवनाची तुलना करुन दु:खी होतात. त्यांच्या डोक्यात नेहमी सेक्स संदर्भात विषय सुरू असतात. 


३)  आपण पकडले जाऊ अशी भितीची भावना यांच्या मनात असते. त्यामुळे इंटरनेटच्या जास्त वापरावर प्रश्न करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी बोलणे ते टाळतात किंवा उद्धट बोलतात. 


४) इंटरनेट सेक्स अॅडिक्ट व्यक्तिंना सतत अपराधीपणाची भावना असते. ते आपल्या इच्छाशक्तिवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.  स्वत:शी निश्चय करुनही ते स्वत:ला बदलू शकत नाहीत. 


५)  अशा व्यक्ती एकळकोंड्या झालेल्या असतात. इंटरनेटवर जास्त वेळ घालविण्याचा नादात आपल्या परिवार तसेच मित्रांपासून ते दूर होतात. अशावेळी इंटरनेटच त्यांचा एकमेव मित्र बनून जातो. दिवसेंदिवस ते यामध्ये फसत जातात. ते आपले लैंगिक विचार सोशल मीडियावरही शेयर करत असतात.