Omicron | ओमयाक्रॉनचं सर्वात पहिल लक्षण, संक्रमण होण्याआधीच व्हा सावधान
जगात वेगाने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन वेगाने पसरतोय. राज्यास देशातही ओमायक्रॉनचे दररोज मोजकेच पण सातत्याने रुग्ण आढळत आहेत.
मुंबई : जगात वेगाने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (Corona Variant Omicron) वेगाने पसरतोय. राज्यास देशातही ओमायक्रॉनचे दररोज मोजकेच पण सातत्याने रुग्ण आढळत आहेत. देशात ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा हा 500 पार गेला आहे. वेगाने वाढणाऱ्या बाधितांच्या आकड्यावरुन ओमायक्रॉनच्या संक्रमनाचा वेग हा डेल्टापेक्षा किती आहे, हे लक्षात येत. (know about of the 1st symptom of corona variant Omicron be careful before the infection)
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची लक्षणं ही वेगळी आहेत. तसं तर आतापर्यंत ओमायक्रॉनची लक्षणं काय आहेत, हे समोर आलं आहे.
ओमायक्रॉनचं उगमस्थान असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, तुम्हाला ओमायक्रॉनची सुरुवातीचं लक्षणच तुम्हाला बाधा झाल्याचं संकेत देतं. जर तुम्ही या प्राथमिक लक्षणाकडे ध्यान दिलं, तुम्ही आजारी पडण्यापासून वाचू शकता.
ओमयाक्रॉनचं पहिल लक्षण काय?
ओमयाक्रॉनचं पहिल लक्षण हे तुम्हाला आवाजातून जाणवू शकतं. जर तुम्ही ओरडत नसाल आणि मोठ्या आवाजात गाणं गात नसाल, यानतंरही तुमचा आवाज इतरांना कर्णकश आणि भसाडा वाटत असेल, तर तुम्हाला ओमायक्रॉनचं प्राथमिक लक्षण असू शकतं.
तसंच गळा बसल्यालासारखं आणि घशात खवखवही जाणवू शकते. तज्ज्ञांनुसार, ही ओमायक्रॉन झाल्याची प्राथमिक लक्षणं आहेत.
डेल्टापेक्षा लक्षण वेगळं
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन रुग्णांना घसा खवखवण्याचा त्रास नाहीये, असं डॉक्टरांचं मत आहे. मात्र त्यांना घशात काय टोचत असल्याचं जाणवतं.
ओमयाक्रॉन बाधित रुग्णांमध्ये हे लक्षण सर्वसाधारण आहे. याशिवाय बंद नाक, कोरडा खोकला, पाठीच्या खालच्या भागातील वेदना यासारखी लक्षणं ही कोरोनाच्या इतर व्हेरिएंट्समध्ये दिसून आली नाहीत", असं डिस्कवरी हेल्थचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान रोच म्हणाले.
ओमायक्रॉनची इतर लक्षणं
यूके, दक्षिण आफ्रिका, आणि अमेरिकेतील काही रिपोर्टनुसार, नाक गळणं, बंद नाक, डोकेदुखी, थकवा, शिंका येणं, अंगदुखी आणि रात्री घाम येणं ही देखील ओमायक्रॉनची अन्य लक्षणं आहेत.
टीम स्पेक्टर हे ओमायक्रॉनच्या लक्षणांवर अभ्यास करत आहेत. टीम यांनी ओमायक्रॉन बाधितांशी यूट्युबद्वारे संवाद साधला. ओमायक्रॉन झाल्यानंतर गळ्यात काही त्रास होतो का, नक्की काय होतं, असा प्रश्न विचारला.
त्यावर ते म्हणाले की, "कोव्हिडसह बाधितांना गळ्यात खवखवंतय. ही खवखव असामान्य आहे. असा प्रकार याआधी आढळून आला नाही. ही खवखव गळ्यातील दुसऱ्या भागात वेगळ्या पद्धतीने जाणवते. आम्ही यावर संशोधन करत आहोत जेणेकरुन या लक्षणाला सामन्य व्हायरसच्या लक्षणापासून वेगळं करता येईल".
ही गोष्ट लक्षात ठेवा
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार, तुमच्यात कोणतीही लक्षणं नसतील यानंतरही अस्वस्थ वाटत असेल, तर कोरोना (RTPCR) टेस्ट करुन घ्यावी. तसेच काही तज्ज्ञांचं असंही सांगण आहे की, तुमच्यात कोरोनाची लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तरीही स्वत:ला आयसोलेट करुन घ्या.