मुंबई : चहाची आवड नसेल असे फार कमी लोकं पहायला मिळतात. यामध्येच अनेकांना मसाला चहा पिण्याची प्रचंड आवड असते. देशातील विविध ठिकाणी मसाला चहा हा तऱ्हेतऱ्हेने बनवला जातो. चवीच्या बाबतीत म्हणाल तर साध्या चहापेक्षा हा चहा छान लागतो. मात्र तुम्हाला माहितीये का मसाल्याच्या चहाची चाहत तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसाला चहा बऱ्याच पद्धतीच्या मसाल्यांद्वारे बनवली जाते. या प्रकारच्या चहामध्ये दालचीनी, वेलची, आलं, काली मिरी, बडीशेप आणि लवंग या मसाल्यांचा समावेश असतो. या सर्व मसाल्यांना चहासोबत उकळलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या या चहाला मसाला चहा म्हटलं जातं.


आता तुमच्या मनात प्रश्न असेल की इतके मसाले टाकूनंही हा चहा शरीरासाठी अपायकारक कसा ठरेल. याचं कारण म्हणजे जेव्हा या मसाल्यांना दूध आणि चहा पावडरसोबत उकळवलं जातं त्यावेळी त्याचे गुणधर्म बदलतात.


मसाला चहा पिण्याचे नुकसान


  • मसाला चहा प्यायल्याने पोटदुखी, पोटफुगी तसंच पोटात जळजळ होण्याची समस्या जाणवू शकते

  • मसाला चहामध्ये कॅफेनचं प्रमाण असतं. त्यामुळे ज्यांना ताणतणाव किंवा चिडेचिडेपणाची समस्या जाणवतेय त्यांनी याचं सेवन करू नये

  • मसाला चहाने एलर्जी होण्याची शक्यता असते. अनेकांना एखाद्या खास मसाल्याच्या पदार्थामुळे एलर्जी होऊ शकते. त्यामुळे असं असल्याचं चहाचं सेवन करू नये.

  • या चहामध्ये मसाल्यांचं प्रमाण असल्याने उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनी याचं सेवन करू नये

  • जर तुमची कोणती औषधं सुरु असतील तर या चहाचं सेवन करणं टाळलेलंच बरं.