Alum Benefits : तुरटीचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का? जाणून घ्या
Alum Benefits : नुसता दाढीसाठीच नाही, दाढीच्याही पलिकडे तुरटीचे अनेक फायदे आहेत? जाणून घ्या कोणते ते?
Alum Benefits : प्रत्येकाच्याच घरात पांढरा दगड म्हणजेच तुरटी (Alum) असतेच. या तुरटीचा सामान्यत पुरूष दाढी केल्यानंतर तोडावर जखम झाली असेल तर ती बरी करण्यासाठी करत असतो. मात्र नुसत दाढी करण्यासाठीच नाही तर दाढीच्याही पलिकडे तरूटीचे अनेक (Alum Benefits) फायदे आहेत. हे फायदे काय आहेत, हे जाणून घेऊयात.
हे ही वाचा : पोटावरचा घेर कमी करायचाय,'हे' Vegetable juice पिऊन बघा
तुरटीचा (Alum Benefits) वापर आजचा नसून प्राचीन काळापासून आहे. पांढऱ्या दगडाचे म्हणजे तुरटीचे अनेक फायदे आहेत. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्याला आजारांपासून वाचवतात. अनेकजण फर्स्ट एड बॉक्समध्ये तुरटीही ठेवतात. कारण जेव्हा जेव्हा कुटुंबातील लहान मुले किंवा वडील जखमी होतात तेव्हा लोक त्यांना तुरटीने स्वच्छ करतात.
युरिन इन्फेक्शन
तुरटी (Alum Benefits) युरिन इन्फेक्शन दुर करते. तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे युरिन इन्फेक्शन दूर करण्यात मदत करतात.
किरकोळ जखम
अनेकदा लहान मुले आणि वडिलधाऱ्यांना किरकोळ जखम होऊन रक्त बाहेर येऊ लागते. अशावेळेस जखमेचा भाग तुरटीच्या पाण्याने स्वच्छ केल्यास रक्तस्त्राव थांबतो. तसेच, त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो.
त्वचेसाठी फायदेशीर
तुरटी (Alum Benefits) त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुरटीच्या पाण्याने चेहऱ्याला मसाज केल्याने चेहरा स्वच्छ होतो. एक प्रकारे, हे चेहऱ्यासाठी नैसर्गिक स्वच्छता म्हणून काम करते आणि त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होते.
डोक्याची घाण दूर करते
अनेक वेळा शॅम्पू टाळूमधील घाण काढू शकत नाही त्यामुळे डोक्यात उवा दिसू लागतात. तुरटीच्या (Alum Benefits) पाण्याने डोके धुतल्यास ते टाळू आणि केसांच्या मुळांपर्यंत जाते आणि घाण बाहेर फेकते. डोक्यातील उवाही याच्या पाण्याने मरतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)