Washing Machine Tips for Undergarments : कपडे धुताना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करतो. त्यात पांढरे कपडे वेगळे धुवावे आणि कलरफूल कपडे वेगळे धुवावे. पण त्यातही अनेकदा कलरफूल कपड्यांमध्ये एक गोष्ट येते ती म्हणजे कोणते कपडे एकत्र धुवावे. हे सगळे नियम अनेकांना ठावूकही नसतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊया... आपण सर्वसाधारणपणे धुण्याचे जे कपडे असतात ते एकाच बादलीत भिजत घालतो. इतंकंच नाही तर आपण मशीनमध्ये देखील आपण हे कपडे एकत्रच धुवायला घालतो. त्यामुळे काही कपड्यांचा रंग दुसऱ्या कपड्यांना लागतो. अनेक लोक तर अंडरवेअर किंवा अंडर गार्मेंट्स किंवा पॅन्टीज या एकत्र धुतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यापैकी बरेच जण अजूनही अंडरवेअर इतर कपड्यांसोबतच एकत्र धूत असाल, पण तुम्हाला माहित आहे असं करणं अगदी चुकीचं आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की असं का? अंडरवेअर नेहमी वेगळीच का धुतली पाहिजे? चला तर जाणून घेऊया... काय आहे त्या मागचं कारण... एका स्टडीमधून एक गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे जी कोणत्याही अंडरवेअरमध्ये दिवसाला 10 ग्रॅम घाण जमा होऊ शकते, इतर कपड्यांवर होणाऱ्या घाणीच्या तुलनेत ती सगळ्यात जास्त हानिकारक असते. अशात जर तुम्ही ती अंडरवेअर इतर कपड्यांसोबत धुतली तर त्यानं तुम्हाला किती इनफेक्शन होण्याची शक्यता आहे याचा विचार करा. 


त्या रिसर्चमधुन आणखी एक गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे, ज्या पाण्यात धुतली जाते त्या पाण्यात सुमारे 100 दशलक्ष एस्चेरिचिया कोलाई आणि स्टॅफिलोकोकस ऑरियस बॅक्टेरिया असू शकतात. ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्याता वाढते. याशिवाय इतर मळक्या कपड्यांसोबत अंडरवेअर  धुतल्याने त्या पाण्यात 100 दशलक्ष E. coli (Escherichia coli) पसरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका आणखी वाढतो.


कशी धुवाल अंडरवेअर? 


आता कामं सोपी करण्यासाठी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन सर्रास  वापरली जाते. कपडे धुवून सुकून निघतात. गृहिणींचा बराच वेळ या मशिनमुळे वाचतो. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का? की ज्या पाण्यानं आपण कपडे धुतो त्या पाण्याचं तापमानं हे एक ठराविक सेल्सिअस असायला हवं. पाण्याचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस असेल तर ते पाणी कपडे धुण्यासाठी योग्य आहे. पण आपण एवढा विचार कधीच केला नाही. दिवसभर आपण जे कपडे घालून प्रवास करतो त्यात किती धूळ आणि घाण अडकते. त्यामुळेच हे कपडे विशेष तापमानातच धुतले पाहिजे. तर अंडरवेअर धुण्यासाठी 40 डिग्री सेल्सिअस तापमाण असायला हवे. अंडरवेअर धुण्यासाठी डिटर्जेंट सोबत ब्लिचचा वापर करा आणि तेही गरम पाण्यात. तेव्हाच ते स्वच्छ धुतले जातील आणि संसर्ग पसरवणारे जंतू मरून जातील.  


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)