मुंबई : धूळ, प्रदूषण, ताण-तणाव आणि इतर शारीरिक कारणं याचा थेट परिणाम चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले डाग, ब्लॅक स्पॉट घालवण्याच्या नादात अनेक जण अनेक प्रकारच्या क्रिम, फेस वॉश, सनस्क्रिन लावतात. पण या सगळ्यामुळेही चेहऱ्यावर अॅलर्जी, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. निस्तेज त्वचा, दाग-धब्बे घालण्यासाठी काही घरगुती, सोप्या उपायांचाही फायदा होऊ शकतो.


पपई - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचा उत्तम राखण्यासाठी पपई अतिशय गुणकारी आहे. पपईमध्ये पपीन नावाचं तत्व असतं जे त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्याचं काम करतं. पपईचा गर बारीक करुन त्यात एक चमचा मध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. त्वचा ड्राय असल्यास त्यात मिल्क-क्रीमही मिसळू शकता. ऑयली त्वचा असणारे या पेस्टमध्ये अर्धा चमचा लिंबू रस टाकू शकता. हे मिश्रण दररोज लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 


कोरफड -


त्वचा आणि चेहऱ्याची सुंदरता कायम राखण्यासाठी कोरफड रामबाण मानलं जातं. कोरफड Black spots Removal क्रिम म्हणून काम करतं. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ईचं तेल आणि लिंबू रस मिळवून ती पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डाग जाण्यास मदत होते. 


पाणी - 


दिवसभरात शरीरासाठी लागणारं पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत होते. पाणी त्वचेचं सौदर्य राखण्यास, त्वचा चमकदार, ग्लोइंग करण्यास मदत करतं. परंतु पाणी पिताना शुद्ध पाणीचं प्यावे. त्यात अल्कोहोल, कार्बोनेटेड ड्रिंक्स मिसळू नये. दररोजच्या रुटीनमध्ये पाण्यासह विविध फळांचे रसही सामिल करु शकता. 


ताक -


ताक पिणं त्वचेसाठी अतिशय फायदेशीर मानलं जातं. ताकात लॅक्टिक अॅसिड आढळतं. जे चेहऱ्यावर येणारे डाग-धब्बे हटवण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. चेहऱ्यावर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, त्या ठिकाणी कापसाने ताक लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. 


  


दही-लिंबू - 


त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी लिंबू अतिशय उत्तम स्त्रोत मानला जातो. लिंबूमध्ये सी व्हिटॅमिन आणि लॅक्टिक अॅसिड असतं. लिंबू रसात दही मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. दही आणि लिंबूच्या पेस्टमध्ये थोडी साखर टाकून ती लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन हटवून चेहरा चमकदार होण्यास मदत होते. 


या घरगुती उपायांच्या वापराने त्वचेचं आरोग्य राखण्यास आणि हानिकारक रासायनिक क्रिमपासून चेहऱ्याचं रक्षण करता येईल.