मुंबई : गजरा माळण्याची परंपरा काही नवी नाही. छानपैकी बांधलेले केस आणि त्यावर माळलेला गजरा एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यात इतकी भर टाकतो की विचारुन सोय नाही. एखादी हेअरस्टाईल अधिक देखणी करण्यासाठी, कोणावर तरी प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून हा गजरा माळला जातो. पण, तुम्हाला माहितीये का, याव्यतिरिक्तही अशी काही कारणं आहेत ज्यामुळं केसात गजरा माळणं फायद्याचं असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोगरा, चमेली, जाई- जुई, अबोली अशा फुलांचा गजरा सहसा केसात माळला जातो. अशा प्रकारचा गजरा अगदी सहजपणे इतरांचं लक्ष वेधतो. हे एखादं आभूषण आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


जाईच्या फुलांच्या गजऱ्याचं फार महत्त्वं आहे. यांचा सुवास मनाती भीती दूर करतो. मन शांत करतो. काही महिला अशाही आहेत ज्यांना अती तणावामुळं झोप येत नाही. अशा वेळी गजरा फार फायद्याचा ठरतो. 


शरीर आणि मनाचं संतुलन राखण्यासाठी गजऱ्याचा वापर होतो. असं म्हटलं जातं की केसांच्या माध्यमातून डोक्यावरील त्वचेतील उष्णता गरजा शोषून घेतो. फार आधीच्या काळापासून महिला याच कारणामुळं गजरा माळत आल्या आहेत. 


असं म्हटलं जातं की कमी निद्रा आणि तणाव सौंदर्याचे शत्रू आहेत. यामुळं तुम्हाला फार कमी वयातच म्हातारपण येऊ लागतं. शिवाय केसगळती, अवेळी केस पांढरे होणं अशा समस्याही उदभवतात. यावर गजरा चांगली मदत करु शकतो. 


अनेक महिला गजरा माळण्याऐवजी जाई- जुईच्या फुलांचा हेअर पॅक,  किंवा तेल बनवून ते केसांवर लावतात. केसांतील दुर्गंधी कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. 


(वरील संदर्भ सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)