Madhuri Dixit beauty secret: धक धक गर्ल माधुरी दीक्षित (madhuri dixit) वयाच्या पन्नाशीतही चाहत्यांना भूरळ पडेल अश्या आरस्पानी सौंदर्याची महाराणी आहे. तिच्या सौंदर्यापुढे आजही नवोदित अभिनेत्री फिक्या पडतील (madhuri dixit beauty and fitness) इतकी ती सुंदर आहे.ती गेले 40 वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत मनावर अधिराज्य गाजवत आहे.  वयाच्या पन्नाशीतही 20 वर्षाच्या तरुणीला लाजवेल इतकी ती सुंदर आणि फिट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या सौंदर्य आणि फिटनेसचं रहस्य पहिल्यांदा (madhuri dixit beauty secrets) जगासमोर आलं आहे. अभिनेत्री, कॅमेरा म्हटलं की,  मेकअप आलाच आणि गेली इतके वर्ष चेहऱ्यावर मेकअप लावून चेहरा खराब होतो पण माधुरीच्या बाबतीत हे गणित जरा जुळत नाही असं म्हटलं तर हरकत नाहीये. कारण आजही तिची त्वचा तितकीच नितळ आणि टवटवीत आहे.


माधुरी दीक्षित आजही इतकी सुंदर दिसते यामागे दडलेलं रहस्य म्हणजे कोणतेही महागडे ब्युटी प्रोडक्टस (beauty products) किंवा ट्रीटमेंट नाहीये.. चला तर मग जाणून घेऊया  माधुरीचा ब्युटी सिक्रेट...


माधुरी सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय करते. त्वचा आणि केस सुंदर राहण्यासाठी कायमच नैसर्गिक उपाय करत असते. (Madhuri Dixit beauty secret homecare for flawless skin)


चिरतरुण दिसण्यासाठी माधुरी दीक्षित काकडीचा वापर करते. हो , तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात,नुकतेच एक मुलाखत झाली ज्यात स्वतः माधुरी दीक्षितने या बाबत खुलासा केला आहे. अगदी सोपा घरच्या घरी करता येणार हा उपाय आहे. बार यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसेसुद्धा मोजण्याची गरज नसणार  आहे.  


  • 1. वयानुसार चेहऱ्याची चमक कमी होऊ लागते, डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात अश्या वेळी माधुरी दीक्षित काकडीचा फेसपॅक वापरते. 

  • २. हा फेसपॅक बनवण्यासाठी काकडी आणि दुधाचा वापर करते. असं केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा आणि निस्तेजपणा कमी होण्यास मदत होते. 


कसा करायचा हा सिक्रेट फेसपॅक


यासाठी तुम्हाला एक काकडी घ्यायचेय तिचे पातळ गोल काप करायचे आहेत एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात हे काप बुडवून ठेवा आता हे भांडं फ्रीझमध्ये ठेऊन द्या. थोड्या वेळाने  हे स्लाइस चेहऱ्यावर सगळीकडे फिरवा.


काय आहेत फायदे 


  •  आपल्याला हे तर माहित आहे की, दूध हे नॅचरल मॉईश्चरायजर आहे त्वचेत आद्र्रता टिकवण्यासच काम ते उत्तमरीत्या करतं.  

  •  मॉईश्चरायजर असण्यासोबत त्वचेचा रंग उजळण्यासाठीसुद्धा दुधाचा खूप उपयोय होतो. 

  •  हा उपाय करण्याआधी एकदा मात्र पॅच टेस्ट करून पाहा. 

  •  तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.