मुंबई : आरशात पाहिल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स तुम्हाला हैराण करून सोडतात ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पैसे खर्च करुनही चेहऱ्यावरचे पिंपल्स काही जाण्याचं नाव घेत नाहीत ?


तुम्हीही जाहीरातींना भुलून हजारो रुपये खर्च केले आहात ? 


हे सर्व करुन जर कंटाळला असाल तर खालील उपाय तुम्ही नक्की करून पाहा


संतुलित आहार


मुरुम टाळण्यासाठी, फळे आणि भाज्या सारख्या संतुलित आणि आरोग्यपूर्ण आहार घ्या.


कोरडी त्वचा कारण 


 बर्याच लोकांना असे वाटते की तेलकट त्वचेमुळे पिम्पल्स येतात, हार्श साबण वापरल्याने हे पिम्पल्स जातात असे अनेकांना वाटत असते. खरं तर कोरड्या त्वचेमूळे पिम्पल्सना उत्तेजन मिळते. 


चेहरा धुवा 


चेहरा दोन,तीन वेळा दररोज धुवा, जर त्वचेला पुरेसा ओलावा असेल तर तो तेलकट राहू शकत नाही. यामूळे पिम्पल्स येण्याची शक्यता कमी होते. 


मॉश्चराईज करा


आपल्या त्वचेला नियमित मॉश्चराईज करा. त्यामूळे त्वचेत ओलावा टिकून राहतो. जर पावसाचे दिवस असतील तर नॉन वॉटर बेस्ड मॉश्चराईज करा. यामूळे भिजल्यानंतरही तुमच्या चेहऱ्यावरून मॉश्चराईजर निघणार नाही.


हात धुवा


बॅक्टेरियापासून दूर राहण्यासाठी चेहऱ्याला कोणतीही क्रिम लावण्याआधी हात नक्की धुवा.