आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पाणी `या` वेळेत पिणे धोकादायक? संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घ्या
अशा परिस्थितीत, आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की, दिवसाच्या कोणत्या वेळी पाणी प्यायला हवे.
मुंबई : आपल्या सर्वांना हे माहित आहे की, पिण्याचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बरेचदा डॉक्टर जास्त पाणी पिण्याचीही शिफारस करतात, पण तुम्हाला माहिती आहे का? की पाणी पिण्याची देखील योग्य वेळ असते. जर तुम्ही योग्य वेळी पाणी प्यायले तर, ते तुमच्या आरोग्यासाठी औषध म्हणून काम करते. परंतु जर तुम्ही चुकीच्या वेळी पाणी प्यायलात तर ते तुमच्यासाठी हानिकारक देखील असू शकते.
अशा परिस्थितीत, आपल्याला माहित असणे गरजेचे आहे की, दिवसाच्या कोणत्या वेळी पाणी प्यायला हवे ते. कारण जर तुम्ही दिवसाच्या या वेळेत पाणी प्यायले नाही तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी पिताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
बरेच तज्ञ म्हणतात की, झोपण्यापूर्वी पुरेसे पाणी पिऊ नये. यामागे दोन कारणे आहेत. एक याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो, कारण तुम्हाला सारख सारखं लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते. या व्यतिरिक्त, तुमची किडनी रात्री हळूहळू काम करते, यामुळे तुम्हाला रात्री चेहऱ्यावर सूज येण्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
आपणा सर्वांना हे माहित आहे की, जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी आणि जेवण झाल्यानंतर अर्धा तास पाणी पिऊ नये. कारण तुमच्या पाचन तंत्रासाठी हा एक चांगला सराव आहे आणि म्हणून लोकांनी जेवणानंतर थोड्या वेळाने पाणी प्यावे.
वर्कआउट दरम्यान पाणी पिऊ नका
अनेक रीपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, जेव्हा तुम्ही व्यायाम करता, त्या दरम्यान तुम्ही पाणी पिणे टाळावे. वास्तविक, या काळात शरीराचे तापमान खूप वाढते आणि त्या काळात पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी इत्यादींची तक्रार देखील येऊ शकते. अशा परिस्थितीत, वर्कआउट संपल्यानंतर काही वेळाने तुम्ही पाणी पिऊ शकता.
अनेक वेळा असे घडते की, आपण गरजेपेक्षा जास्त पाणी पितो आणि त्यामुळे सारखे सारखे आपल्याला लघवीला जावे लागते. परंतु, जर तुमचे मूत्र पूर्णपणे पांढरे किंवा स्पष्ट असेल तर तुम्हाला काही काळ पाणी पिण्याची गरज नाही आणि जर मूत्र हलका पिवळा किंवा पिवळा रंग असेल तर पाणी प्यावे. अशा स्थितीत, तुम्हाला लघवी झाल्यानंतप लगेच पाणी पिऊ नये.