रोजच्या गडबडीच्या जीवनशैलीमुळे आपलं स्वत:कडे दुर्लक्ष होत असतं. आपण निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम नियमित गरजेच असतं. त्यासोबतच शांत आणि 7-8 तास झोप होणे गरजेच आहे. आरोग्यतज्ज्ञांनुसार अपूर्ण झोपेमुळे आरोग्याचा अनेक समस्या निर्माण होता. अगदी लठ्ठपणापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगली झोप हा निरोगी जीवनशैलीचा महत्वाचा भाग आहे. दिवसभर उत्साही रहायचं असेल तर चांगली झोप म्हणजेच किमान  7 - 8 तासाची झोप व्हायला हवी. पण नोकरीच्या वेळा, घरातील आणि कामाच टेन्शन, इतर अनेक कारणांमुळे आपल्याला शांत झोप लागत नाही. अनेक जण हे अगदी 4-5 तास झोपतात. एखाद्या दिवशी किंवा जास्त जास्त दोन तीन झोप अपूर्ण राहिल्यास तसा आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही. पण ही समस्या अगदी दीर्घकाळापासून असल्यास कर्करोगाचं कारणं ठरु शकतं, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.   


आरोग्यतज्ज्ञांनुसार आपण जेव्हा शांत झोपतो तेव्हा आपल्या शरीरात मेलाटोनिन हार्मोन सक्रिय होतात जे आपल्या सर्कॅडियन चक्रावर नियंत्रण ठेवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शरीरातील मेलाटोनिनची पातळी आणि कोलेस्ट्रॉल, प्रोस्टेट, स्तन, गॅस्ट्रिक, फुफ्फुस आणि तोंडाचा कर्करोग यांसारख्या अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये थेट संबंध असल्याचे तज्ज्ञांना आढळून आलंय. 


झोप आणि कर्करोग यांच्यातील दुवा काय? 


आरोग्यतज्ज्ञांच्यानुसार, रात्री सूर्यास्तानंतर अंधारात मेलाटोनिनच्या उत्पादनला सुरूवात होते. ही झोपेची सामान्य वेळ असते. मात्र या वेळेत झोप न मिळाल्याने शरीर मेलाटोनिन तयार होण्यास अडथळे येतात. त्यामुळे कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास निमित्त मिळतं. त्याचबरोबर रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असतो. 


मेलोटोनिन कर्करोग कसा टाळतो ? 


मेलोटोनिन हे मेंदूमध्ये तयार होणारे हार्मोन आहे जे अंधारात वाढते आणि दिवसाच्या प्रकाशात कमी होते. मेलाटोनिन कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात त्याचबरोबर रोगप्रतिकारक सक्रिय करतात. ज्यामुळे कर्करोगाची वाढ तसंच मेटास्टेसाइड करण्याची क्षमता कमी होते. मेलाटोनिन कर्करोगाचा धोका कमी फायदेशीर आहे, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात. 


शरीरात मेलाटोनिनची मात्रा कशी राखायची?


योग्य मेलाटोनिन पातळी राखण्यासाठी तुमची झोप पूर्ण करणं महत्वाचं आहे. झोपताना खोलीमध्ये योग्य असं वातावरण तयार करा. खोली शांत, अंधुक प्रकाश असलेली, थंड ठेवा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. सरासरी झोपेचे तापमान स्थानानुसार बदलू शकतं, म्हणून खोलीचं तापमान योग्य प्रमाणात ठेवा. 8 ते 10 तास झोप घ्या. झोपताना मोबाईलचा वापर करणं टाळा कारण. त्यामधून निघणारा निळा प्रकाश डोळ्यांना त्रासदायक ठरतो तर याचबरोबर मेलाटोनिनच्या निर्मितीलाही हानी पोहचवते.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)