मुंबई : आजच्या दगदगीच्या जीवनात उच्च किंवा कमी रक्तदाबाचा त्रास वाढत चालला आहे. परंतू तुम्हाला हे माहित आहे का? अनेक वेळा विटामिन 'डी'च्या कमतरतेमुळे देखील लहान मुलांमध्ये रक्तदाबाचा धोका वाढतो. एका अभ्यासानुसार, जन्माच्या वेळी किंवा गर्भावस्थेत असतांना, जर मुलांना विटामिन डी मिळाले नाही, तर मुलांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.


कॅल्शियम तयार होण्यासाठी विटामीन डी महत्वाचं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली हाडं मजबूत ठेवण्यासाठी हाडात कॅल्शियम तयार होणे गरजेचे असते, आपल्या हाडात दोन प्रकारे कॅल्शियम तयार होत असतात, एक सकाळचा सूर्यप्रकाश अंगावर पडल्यावर विटामिन 'डी' तयार होते, विटामीन 'डी'ची मदत हाडात कॅल्शियम तयार होण्यास होते, आणि दुसऱ्या प्रकारे आपल्या शरीरातून तयार होणारं कॅल्शियम.


उच्च रक्तदाबाचा त्रास ६० टक्क्यांनी वाढतोय


एका अभ्यासात हे दिसून आलं आहे की, गर्भावस्थेत किंवा लहानपणी जर योग्य प्रमाणात विटामिन डी नाही मिळाले, तर वयाच्या ६ ते १८ वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये हाय सिस्टोलिक ब्लड प्रेशरचा त्रास ६० टक्के लोकांमध्ये वाढतो. हा निष्कर्ष काढण्यासाठी संशोधकांनी बॉस्टन मेडिकल सेंटरमध्ये काढण्यात आला. यासाठी १८ वर्षांपर्यंतच्या ७७५ मुलांचं निरीक्षण करण्यात आलं.


उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर हा एक असा त्रास आहे, जो आजकाल अनेकांना होत आहे. रक्तदाब वाढल्याने रक्तवाहून नेणाऱ्या धमन्यांमधील रक्ताच्या प्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे हृदयाला त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागतं.


खरंतर जास्त तळलेलं, चिकट तेलकट पदार्थ जेवणात किंवा खाण्यात आल्याने, तसेच शारिरिक श्रम कमी होत असल्याचं उच्च रक्तदाबाचा त्रास वाढत जातो.


डायटीशन यांच्या मते ज्या फळं तसेच पालेभाज्या यांचा समावेश जेवणात केल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होवू शकतो किंवा दूर होवू शकतो.


उच्च रक्तदाब नियंत्रणात आणणारी फळं


ज्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आहेत, अशा भाज्यांचा जेवणात समावेश करा. कारण पोटॅशियम उच्च रक्तदाब कमी करू शकतो. खालील फळं खाल्यास तुमचा रक्तदाब निश्चितच नियंत्रणात राहणार आहे.


स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळं. यात कॅरोटीन, कॅल्शियमसारखे फायबर्स असतात. जे स्ट्रेस कमी करतात आणि बीपी देखील नियंत्रणात आणतात.


उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्यात केळी महत्वाची भूमिका बजावते, केळी पोटॅशियमचा सर्वात चांगला स्त्रोत आहे.


उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी, भरपूर अॅटिंऑक्सिडंट, विटामीन सी, ओमेगा ३ फॅट्टी अॅसिडची गरज असते, आणि ते रताळ्यात असतं. स्ट्रॉबेरीमधील पोटॅशियम उच्च रक्तदाबाला नियंत्रित करत असतं.


उच्च रक्तदाबाला नियंत्रित करणारी फळं


उच्च रक्तदाबाला नियंत्रित करण्याचं काम, फळांचा राजा आंबा व्यवस्थित पार पाडतो, कारण आंब्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतात.


कलिंगडात देखील मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडेंट असतात, तसेच मोठ्या प्रमाणात विटामीन सी आणि पोटॅशियम देखील असतं.


उच्च रक्तदाबाला नियंत्रित ठेवण्यासाठी काही उपाय आहेत, जसे एक कीवीमध्ये २ टक्के कॅल्शियम, ७ टक्के मॅग्नेशियम आणि ९ टक्के पोटॅशियम असतं. यासाठी दिवसातून केवळ ३ किवींचं सेवन केलं पाहिजे.


याशिवाय दही देखील उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकतं. दहीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, विटामीन बी ६, आणि विटामीन बी १२ भरपूर प्रमाणात असतं, यामुळे देखील रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत होते.