Ladyfinger Water Benefits : भेंडीमध्ये भरपूर पोषक असतात, भेंडीचा आहारात समावेश केल्याने आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. भेंडीमध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. भेंडी पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने खूप फायदे होतात. नक्की काय फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत. (Ladyfinger water health benefits in hindi know how to make healthy water Health marathi News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेंडीचे लहान लहान तुकडे करा आणि एक ग्लास पाण्यात भिजवा. रात्रभर भिजवल्यानंतर, भेंडी थोडी नरम पडेल, त्यानंतर ती गरम पाण्यामध्ये उकळवा. भेंडीतील पोषक तत्व पाण्यात शोषले जातील. भेंडीतील पोषक द्रव्य पाण्यात उतरल्यावर भेंडीचे केलेले तुकडे वेगळे करा आणि पाणी वेगळं करून घ्या. 


भेंडीचं पाणी पिण्याचे फायदे


भेंडीच्या पाण्यामुळे हृदय निरोगी राहते. यामध्ये असलेले पेक्टिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. भेंडीमध्ये आढळणारे विद्राव्य फायबर रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या दूर राहतात.


भेंडीचे पाणी मधुमेहासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. याच्या सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी रोज भेंडीचे पाणी सेवन केल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात व्हिटॅमिन के असते जे जास्त रक्तस्त्राव रोखण्यास मदत करते. भेंडीमध्ये असलेले लोह हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करते. भेंडीचे पाणी प्यायल्याने अॅनिमियासारख्या आजारांचा धोका दूर राहतो.


भेंडीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, त्यामुळे भेंडीचे पाणी सर्दीसारख्या आजारांना दूर ठेवण्यास उपयुक्त ठरते.


भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे. या पाण्याने दृष्टी चांगली राहते. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.