मुंबई : संपूर्ण प्रदूषणाचा स्तर वाढलेला दिसून आलाय. इतकंच नाही तर प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूचे आकडे आता समोर आलं आहेत. प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय, हे भीषण वास्तव या आकड्यांद्वारे निदर्शनास आलं आहे. भारतात 2019 मध्ये प्रदूषणामुळे 23.5 लाखांहून अधिक लोकांचा बळी गेल्याचं 'द लॅन्सेट प्लॅटेनरी हेल्थ जर्नल'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जगभरातील सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे वर्षाला सुमारे 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. वाहनं आणि उद्योगांच्या धुरामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 2,000 पासून 55 टक्क्यांनी वाढलीये.


अभ्यासानुसार, 23 लाख मृत्यूंपैकी सुमारे 16.7 लाख मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे आणि 5 लाखांहून अधिक मृत्यू जलप्रदूषणामुळे झाले आहेत. भारतातील बहुतेक वायू प्रदूषणाशी संबंधित मृत्यू पीएम 2.5 कणांमुळे होणाऱ्या वातावरणाशी संबंधित आहेत.


भारत आणि चीनमध्ये धोका अधिक


प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत भारत आणि चीन जगात आघाडीवर आहेत. भारतात, दरवर्षी सुमारे 2.4 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर चीनमध्ये सुमारे 2.2 लाख लोकांना प्रदूषणामुळे जीव गमवावा लागतो. 


अमेरिकेतील प्रदूषणाची परिस्थिती


प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या बाबतीत उद्योगावर अवलंबून असलेल्या टॉप 10 देशांमध्ये अमेरिका हा एकमेव देश आहे. 2019 मध्ये 1,42,883 प्रदूषण-संबंधित मृत्यू असून अमेरिका जगात सातव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अनुक्रमे बांगलादेश आणि इथिओपिया यांचा समावेश आहे. प्रति लोकसंख्येचा मृत्यू दर पाहिला, तर अमेरिका तळापासून 31 व्या स्थानावर आहे.