Less sleep : कोणत्याही व्यक्तीला शारीरिक, आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य प्रमाणात झोप (Sleep) घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, ही झोप किमान 6 तास असायला हवी तरच तुमचं आरोग्य निरोगी राहू शकतं. पण अनेकांची तक्रार असते की, त्यांना झोपच लागत नाही. प्रौढांना तर 7 ते 9 तासची झोप आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण जर तुम्ही कमी झोपत असाल तर तो चिंतेचा विषय आहे. कारण 50 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज 5 तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्यांना अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात.


कमी झोपाल तर जिवाला कायमचे मुकाल


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी झोप घेतल्यामुळे कॅन्सर, ह्दयरोग, ह्दयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार असे आजार होऊ शकता. नैराश्य येऊ शकतं,  विस्मरणाचा धोका संभवतो. इतकच नाही तर पार्किन्सन, संधिवात, आणि मानसिक विकार होऊ शकतात. 



माणसाचं वय जसजसं वाढत जातं. तसंतसं झोपेच्या चक्राचं स्वरुप बदलतं. प्रौढांपेक्षा तरूणवर्ग जास्त झोप घेतो. मात्र धकाधकीच्या आयुष्यामुळे सर्वांच्याच झोपेवर परिणाम होऊ लागलाय. कोरोनानंतर तर अनेकांची झोपच उडालीय. पण ही कमी झोप तुमच्या जिवावरही उठू शकते त्यामुळे चांगलं आरोग्य हवं असेल तर झोपेकडे दुर्लक्ष करू नका. दररोज किमान 7 ते 8 तास झोपा आणि निरोगी राहा.


प्रत्येक व्यक्तीला झोप गरजेची


झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध समस्या जडतात. तसंच यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावते. प्रत्येकाला आपल्या वय, प्रकृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक आहे. आवश्यकतेनुसार झोप न मिळाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात.


  • नवजात बाळ (३-११ महिने) - कमीत कमी १४-१५ तास

  • १२-३५ महिन्यांचे बाळ- १२-१४ तास.

  • ३-६ वर्षांचे मुल- ११-१३ तास

  • ६-१० वर्षांचे मुल- १०-११ तास

  • ११-१८ वर्षात- ९:३० तास

  • मध्यम वयात- ८ तास

  • वृद्ध- ८ तास