मुंबई : आपल्या सगळ्यांचे आयुष्य घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे चालते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत आपले शेड्युल ठरलेले असते. मग अशा वेळेत स्वत:ला वेळ कसा द्यायचा हा प्रश्न पडतो. 'वेळ मिळत नाही वेळ काढावा लागतो' हे वाक्य आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो आणि त्या वाक्यातच गुपित दडले आहे. तुम्ही कधी स्वत:साठी वेळ काढलाय का? नाही? पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा कधीतरी स्वत:वर स्वत:चाच वेळ खर्च करून पाहा... पुढे जे काय होईल त्यासाठी तुम्हीच जबाबदार असाल. (Lifestyle Do you spend time on yourself If not try it) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सकाळी कॉफी/चहाची वेळ(Coffee/Tea)
सकाळी उठल्यावर स्वत:साठी कॉफी/ चहा बनवा. कॉफी पिताना आपल्या मनात काहीच विचार न आणता फक्त कॉफीची/चहाची मजा घ्या. गेल्या आठवड्यात आपण केलेल्या कामांचा विचार करा. कोणते काम करणे गरजेचे आहे, कोणते काम राहिले आहे याची यादी तयार करुन त्याची नोंद करा.


2. तुमचा आवडता चित्रपट किंवा सीरीज बघा (Movie/Web series)
आपलं शेड्युल व्यग्र असल्यामुळे चित्रपट किंवा सीरीज पाहणे कठीण होऊन जाते. ज्यादिवशी तुम्ही स्वत:ला वेळ द्यायचा ठरवता त्यादिवशी असे चित्रपट किंवा सीरीज बघा ज्यामुळे तुम्ही मोटीवेट (Motivate) व्हाल आणि सोबतच तुमचे मनोरजंन (Entertainment) होईल.


आणखी वाचा... Relationship tips: तुम्ही डेटला गेल्यावर या चुका करता का? चुका टाळण्याच्या सिक्रेट टिप्स


3. स्वत:साठी काहीतरी खायला बनवा
आपण कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यामुळे बाहेरील खाणं जास्त खातो. ज्यादिवशी तुम्ही सुट्टीवर किंवा घरी असता तेव्हा तुम्हाला जे खायायला आवडते ते स्वत: साठी बनवा. रेग्यूलर रुटीन (Regular Routine) मधुन आपल्याला फार कमी वेळ मिळतो असे काहीतरी करायला तर कंटाळा न करता जेवण करताना त्या क्षणांचा आनंद घ्या. 


4. पॉडकास्ट किंवा गाणी ऐका (Podcast/Song)
सकारात्मक उर्जा तयार करण्यासाठी आपल्याला पॉडकास्ट आणि गाण्यांचा चांगला फायदा होतो. संध्याकाळी चालायला जाताना शक्यतो पॉडकास्ट आणि गाणी ऐका तुमची संध्याकाळ अजुन छान आणि रम्य होते. खुप चांगले विचार मनात आणि डोक्यात येतात. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो.


आपल्याला नेहमीच असे वाटते की हे सगळे आयते आपल्या हातात यावे. आपले काही चुकीचे हट्ट असतात. समोरच्याने आपल्या आवडीनिवडी विचारात घ्यावात किंवा पुर्ण कराव्यात असे आपल्याला वाटत असते. पण समोरील व्यक्तीकडून अशा अपेक्षा करणे कितपत योग्य? वरील टिप्स वाचून तुम्हाला तुमच्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. काय मग... देणार ना स्वत:ला वेळ?


आणखी वाचा... Weight Gain Tips: बारीक आहात, वजन वाढवायचंय? आहारात 'या' स्वस्त गोष्टींचा वापर आजच सुरु करा