Precautions While Using Electric Geyser : हिवाळा सुरू झाला असून आता वाढत्या थंडीमुळे गार पाण्याने अंघोळ करणं टाळताना दिसत आहेत. थंडीच इतकी आहे की गार पाण्याने अंघोळ करायचा विचार केला तरी अंगावर काटा येतो. थंडीमध्ये अनेकजण घरामध्ये गिझर बसवायला सुरूवात करतात. मात्र गिझरमुळे विजेचा शॉक लागून मोठा अपघात होण्याचा धोका असतो. इलेक्ट्रिक गिझर बसवताना पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. बाथरूमच्या ज्या भागात तुम्ही गिझर लावत आहात, त्या भागात भिंत आणि गीझर यांच्यामध्ये थोडी मोकळी जागा असणे आवश्यक आहे, अन्यथा, भविष्यात जेव्हा गिझर खराब होईल तेव्हा त्याच्या दुरुस्तीमध्ये अडचणी येतील.
2. गिझर जास्त उंचीवर लावू नये, कारण असे केल्याने तिथे हात पोहोचण्यास अडचण येते. जेव्हा तुम्हाला ते सर्व्हिस करून घ्यावे लागते, तेव्हा मेकॅनिकसाठी ते करणे सोपे नसते.
3. नेहमी ऑटो पर्याय असलेले गिझर खरेदी करा, ज्यामुळे पाणी पूर्णपणे गरम झाल्यावर ते बंद होईल, यामुळे धोक्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
4. गीझरचा स्विच थोडा उंच ठिकाणी असावा जेणेकरून लहान मुलांचे हात तिथे पोहोचू शकत नाहीत


धक्का टाळण्यासाठी काय करावे?
1. गिझर वापरताना विजेचा धक्का लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. यासाठी नळ चालवताना किंवा शॉवर घेताना कधीही गिझर चालू करू नका.
2. विजेचा धक्का टाळण्यासाठी, तुम्ही 10 ते 15 मिनिटे आधी गीझर चालू करा आणि पाणी गरम करा. जर तुम्हाला जास्त पाणी हवे असेल तर तुम्ही ते बादलीतही साठवून ठेवू शकता.
3. हिवाळ्याच्या सुरुवातीस आणि त्यादरम्यान इलेक्ट्रिक गीझरची सर्व्हिसिंग करत राहा, यामुळे गिझर व्यवस्थित काम करत आहे की नाही याची खात्री होईल.
4. गीझरच्या आत असलेला एनोड रॉड दरवर्षी तपासला पाहिजे कारण त्यावर अनेक वेळा घाणीचा थर साचतो आणि नंतर पाणी गरम होण्यास वेळ लागतो.