कशामुळे बळावतो ओठांचा कॅन्सर ? `या` लक्षणांकडे दुर्लक्ष नको
ओठ हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयांपैकी एक आहे.
मुंबई : ओठ हा शरीरातील अत्यंत नाजूक अवयांपैकी एक आहे. मात्र आपण ओठांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अनेकदा ओठांच्या कॅन्सरकडे दुर्लक्ष केले जाते. ओठांच्या कॅन्सरदरम्यान लोकांना खाता-पितानादेखील त्रास होतो. म्हणूनच कॅन्सरचा धोका वेळीच ओळखण्यासाठी या लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका. केमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ?
ओठांच्या कॅन्सरची लक्षण -
ओठांचा कॅन्सर बळावत असल्यास
- दात कमजोर होतात
-ओठांच्या आजूबाजूच्या भागावर जखम होणं, रक्तस्त्राव होणं
-ओठांवर सूज येणे, वेदना जाणवणं
-ओठांवर पांढरा स्तर दिसणं
- ओठांचा भाग लालसर होणं
- गळ्याजवळ, तोंडाजवळ वेदना जाणवणं
-आवाजात बदल होणं
कशामुळे होऊ शकतो ओठांचा कॅन्सर ?
तंबाखू, गुटखा खाणार्यांमध्ये ओठांचा कॅन्सर बळावतो
ओरल सेक्स करणार्यांमध्ये
सूर्यप्रकाशात अधिक दिवस राहणार्यांमध्ये, अतिनील किरणांमुळे ओठांचेही नुकसान होऊ शकते
सिगारेट, हुक्का पिण्याची सवय असणार्यांमध्ये