केमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ?

स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. 

Updated: Aug 6, 2018, 02:11 PM IST
केमोथेरपीशिवाय ब्रेस्ट कॅन्सरवर मात शक्य ? title=

मुंबई : स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा एक कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर. कॅन्सर हा आजार दुर्धर असल्याने तसेच त्यावरील उपचारही प्रचंड वेदनादायी असल्याने रूग्ण केवळ त्याच्या नावानेही घाबरतात. मात्र आता ब्रेस्ट कॅन्सरच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी केमोथेरपीचीही गरज नसल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे.  

काय आहे  नवे संशोधन ? 

स्तनांच्या कर्करोगासंदर्भात आरोग्यक्षेत्रात एक दिलासादायक बातमी आहे.अमेरिकेत झालेल्या एका महत्वाच्या संशोधनानुसार ७० टक्के रुग्णांमध्ये केमोथेरीपी थेरपीशिवाय कर्करोग बरा होणं शक्य होणार आहे. ऑन्को टाईप डीएक्स नावाच्या टेस्टनं महिलेला झालेला कर्करोगाची स्थिती ओळखता येते. या टेस्टमध्ये जर सकारात्मक निकाल आले, तर स्तनांच्या कर्करोगाने महिलेला केमोथेरपी न घेताच कर्करोग बरा होऊ शकणार आहे. अमेरिकेतली एका कॅन्सर इन्स्टिट्युटनं केलेलं संशोधन इंग्लंडच्या प्रसिद्ध न्यू इंग्लंड जर्नल ऑफ इन्स्टिट्यीटूनं छापलंय. तुम्ही कॅन्सरच्या उपचारांसाठी मुंबईत आलाय ? मग या ठिकाणी टाटा मेमोरियलतर्फे केली जाते रूग्णांची राहण्याची सोय