मुंबई : आपल्या घरात दररोज जेवण बनवलं जातं आणि जेवण जेवल्यावर खरखटी ताटं किंवा भांडी घासली जातात. तसे पाहाता हे सर्वांच्याच घरी नेहमीचंच काम आहे. हे काम काही जण स्वत: करतात, तर काही जण घरकामात मदत करण्यासाठी एक बाई ठेवतात. परंतु तुम्हाला माहितीय का की, भांडी धुताना जर तुम्ही या चुका करत असाल, तुम्हाला ते महागात पडू शकतं. आता तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहिल असेल की, नक्की भांडी धुण्याची अशी कोणती पद्धत आहे? चला सविस्तर जाणून घेऊ या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात भांडी धुण्यासाठी डिटर्जंट वापरता तेव्हा ते स्वच्छ पाण्याने नीट धुवा, कारण हे डिटर्जंट तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतं. अहवालानुसार, डिटर्जंटमध्ये हानिकारक रसायने असतात, जे पोटात गेल्यास यकृताचा कर्करोग होऊ शकतो.


हो ही गोष्टी आपल्याला छोटी वाटत असली तरी यामुळे होणारी समस्या ही गंभीर आहे. घरातील स्वयंपाकघरातूनही कॅन्सर माणसांच्या शरीरात पोहोचत असतो, त्यामुळे त्यांनी त्याबाबत खूप काळजी घ्यायला हवी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


'द सन'च्या वृत्तानुसार, जे लोक स्वयंपाकघरातील भांडी धुण्यात निष्काळजीपणा करतात त्यांना कर्करोगाचा धोका चौपटीने वाढू शकतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, आपण भांडी धुण्यासाठी जे साबण आणि डिटर्जंट वापरतो, ते काळजीपूर्वक धुणे फार महत्वाचे आहे अन्यथा ते भांडे, ग्लास, चमचे, ताटांमध्ये चिकटून राहतात. जेव्हा आपण कोणतेही अन्न खातो किंवा भांड्यातील पाणी पितो तेव्हा ते रासायनिक कण आपल्या शरीरात जातात आणि यकृतपर्यंत पोहोचून शरीराचे मोठे नुकसान करतात.


यकृताच्या कर्करोगावर संशोधन करणाऱ्या डॉ. जेसी गुडरीच यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी संशोधनासाठी 100 जणांची निवड केली. त्यापैकी 50 जणांना यकृताच्या कर्करोगाची समस्या होती आणि 50 जणांना अशी कोणतीही समस्या नव्हती. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली.


त्यात असे आढळून आले की, ज्यांना यकृताचा कर्करोग झाला आहे, त्यांच्या शरीरात रसायनाचे प्रमाण अधिक आहे. भांडी पूर्णपणे स्वच्छ न केल्याने आणि इतर कारणांमुळे हे रसायन आपल्या शरीरात पोहोचले आणि नंतर यकृतावर हल्ला केला.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)