Lungs Cough Relief Tips News In Marathi : वातावरणात बदल झाला की, त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतोच. आता थंडीचे दिवस सुरु आहेत. अशा दिवसांमध्ये सर्दी-खोकला, घसा खवखवणे, कफ होणे, ताप येणे इत्यादी अनेक समस्यांना सुरुवात होते. या समस्यांना दूर करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो.  सर्दी-खोकल्याची समस्या लवकर बरी होऊ शकते. मात्र, थंडीमुळे तयार झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे घरगुती उपाय काय आहेत? चला जाऊन घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हळद – हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्कृष्ट आयुर्वेदिक घटक आहे. हा पदार्थ जो एक उत्कृष्ट जंतुनाशक आणि अँटी-बॅक्टेरियल आहे. कफ आणि खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते. मध, गूळ आणि हळद यांची गोळी घेणे सर्दीसाठी योग्य आहे. तसेच गरम दूध आणि हळद घेतल्याने खोकल्यामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते.


लसूण – लसूण हा आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने दिवसातून किमान 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या खाव्यात. लसनामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात लसूण आणि आले ठेवावे.


आले- आल्यामध्ये स्वतःच अनेक उपयुक्त गुणधर्म आहेत जे खोकला आणि सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी योग्य असू शकतात. चवीला थोडस तिखट असला तरी आहारात त्याचं प्रमाण योग्य असावे. 


हे सुद्धा वाचा : वयानुसार किती असावी cholesterol ची पातळी? जाणून घ्या एका क्लिकवर


गुळण्या करणे - गुळण्या करणे हे घसा, सर्दी आणि खोकल्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो. सर्दीचे व्हायरस बहुतेक वेळा घशावर आक्रमण करतात. त्यामुळे हिवाळ्यात कोमट पाणी दिवसातून 3 ते 4 वेळा गुळणे करणे कफसाठी उपयुक्त ठरु शकते. 


लिंबू – लिंबूमध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी उपयुक्त असतात. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.