मुंबई : कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता केंद्रीय पथक पुन्हा राज्यात दाखल होणार आहे. त्याचबरोबर कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार Favipiravir Tablets (फेविकोविड २००) आणि Remdesivir (रेमडेसीवीर) ही औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजशे टोपे यांनी सांगितले की, कोविड-१९ रुग्णांच्यावर उपचार करण्यासाठी ही औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राजेश टोपे यांनी माध्यमांना सांगितले की, कोविड -१९च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी आम्हाला फेविपिराविर (फेविकोविड २००) आणि रेमडेसीवीर आणि इतर आवश्यक औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी कराव्या लागतील. ही औषधे महाग आहेत, म्हणूनच राज्य सरकारने ती खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.


कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसीवीर, फेविपिरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधिकरणाकडे मागणी केली. त्यानुसार आता राज्यात जून महिन्याच्या अखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.


राज्यात काल कोरोनाच्या ४८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गुरुवारी ३६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७७ हजार  ४५३ झाली आहे.  दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी आता राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ अण्डीबॉडीज् चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे, अशी माहिती  राजेश टोपे यांनी गुरुवारी येथे दिली.