Facial Tips for Diwali Festive Season: दिवाळीचा सण आता अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. अनेक गृहिणींना आणि कर्मचारी स्त्री वर्गाला वेळेच्या अभावामुळे पार्लरला जाता येत नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी करत घरीच मेकअप करावा लागतो. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आपण बिझी वेळेत इझी मेकअप (Make up tips for Diwali) करून शकतो. या काही टीप्स जर तुम्ही फोलो केल्यात तर तुम्हाला आकर्षक असा मेकअप घरच्या घरी करता येईल. (makeup tip for instant glow these are the simple steps to do fast makeup in diwali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दिवाळीत आपण सर्वजण घराची साफसफाई, सजावट आणि फराळाचे पदार्थ करण्यात व्यस्त असू. ही कामं झाल्यानंतर आपण आपल्यासाठी वेळ देतो आणि मेकअप, शॉपिंग आणि पार्लरसारख्या गोष्टींसाठी वेळ काढायचा प्रयत्न करतो. परंतु पार्लरला जाण्याचा अनेक जणींना कंटाळा त्यापेक्षा त्या घराच्या घरी मेकअप करण्यावर भर देतात. तेव्हा जाणून घेऊया 


आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'


  • आयमेकअप (Eye Makeup) हा आजकाल सर्वाधिक लोकप्रिय आहे. डोळे शार्प दिसावेत आणि जास्त हायलाईट व्हावेत म्हणून आपण आईनलायनर आणि काजळ वापरतो, तेव्हा बाजारात असे आयलाईनर आणि काजळ एकाच पेन्सिलमध्येही मिळतात ते तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्याप्रमाणे टू इन वन असा लुक करत काजळ आणि आयलाईनरचा वापर करून घ्या. त्याप्रमाणे सध्या वेस्टिव लुकसाठी विविध आयमेकअप शेड्स आले आहेत. ज्यात तुम्ही थोडा हलका तर डार्क आयमेकअपही करू शकता. 

  • वेगवेगळी महागडी उत्पादने (Expensive makeup product tips) वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी चांगला आणि आकर्षक मेकअप करून शकतो. चेहऱ्यावरील डाद, सुरकुत्या लपवण्यासाठी तुम्ही फाऊंडेशन लावू शकता. डार्क सर्कल्स लपवण्यासाठीही तुम्ही फाऊंडेशन लावू शकता. त्यातून जर तुम्हाला फाऊंडेशन आवडत नसेल तर तुम्ही बीबी क्रिमही (BB Cream) वापरा. 

  • लिपस्टिक (Lipstick) ही आपल्या कधीही हवीच असते. तेव्हा येत्या दिवाळीतही तुम्ही लिपस्टिकचे हजारो शेड्स वापरू शकता. अनेकदा स्त्रियांना हलक्या आणि पेस्टल कलरच्याही लिपस्टिक्स आवडतात तेव्हा तुम्हीही असा लिपस्टिक लुक येत्या फेस्टिव सिझनसाठी करू शकता. 


आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे


यंदाच्या दिवाळीला अशीच काहीशी तयारी करून ठेवा आणि त्यासाठी तुम्हीही यंदा असेच प्रयोग करून पाहा.