मुंबई : आज जगभरात योगदिन अगदी उत्साहात साजरा केला जात आहे. बॉलिवूड कलाकारांमध्येही योगाची जबरदस्त क्रेझ आहे. यातील एक नाव म्हणजे फिटनेस फ्रिक अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका अरोरा आपल्या जीवनात योगाला अत्यंत महत्त्व देते. स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती नियमित योगाभ्यास करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगदिनानिमित्त न्यूज एजेंसी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत तिने योगासनाचे फायदे आणि तिचे आवडते आसन याबद्दल सांगितले. पाहुया योगसाधनेबद्दल मलायका अरोरा काय म्हणाली...



पद्मासन


पद्मासन हे बसून करायचे आसन असून ते ध्यानात्मक आसन आहे. त्यामुळे मन शांत होते. त्यामुळे ध्यान लागण्यास मदत होते. यामुळे अनेक शारीरिक समस्या दूर होतात. याबद्दल मलायका म्हणते की, पद्मासन माझे आवडते आसन आहे. यामुळे एकाग्रतेची आवश्यकता असते. संपूर्ण शरीर स्वस्थ राहते. शरीर आणि आत्मा यातील संतुलन राखले जाते. शरीरातील ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होतो. चटईवर बसून करायचे हे आसन तुमची क्षमता वाढवते. 


सुर्यनमस्कार


सुर्यनमस्कार हे सर्वांगिण आहे. यामुळे संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. याबद्दल ४४ वर्षीय मलायका अरोरा म्हणते की, सुर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांना व्यायाम मिळतो. विषद्रव्ये बाहेर पडतात. रक्तसंचार सुधारतो. चेहरा तेजस्वी होतो. शारीरिक-मानसिक आरोग्य राखले जाते. माझ्यासाठी सुर्यनमस्कार एक परिपूर्ण वर्कआऊट पॅकेज आहे.