वडील होण्याचं योग्य वय कोणतं? प्रत्येक पुरुषासाठी महत्वाची आहे ही माहिती
तुम्ही लोकांना हे बोलताना पाहिलं असेल की, महिलांचे आई होण्याचे योग्य वय असते, त्या वयात मुली आई झाल्या तर त्यांना प्रेग्नेंसीमध्ये आणि मुल झाल्यावर समस्यांना सामोर जावं लागत नाही.
मुंबई : तुम्ही लोकांना हे बोलताना पाहिलं असेल की, महिलांचे आई होण्याचे योग्य वय असते, त्या वयात मुली आई झाल्या तर त्यांना प्रेग्नेंसीमध्ये आणि मुल झाल्यावर समस्यांना सामोर जावं लागत नाही. परंतु पुरुषांबाबत असं काहीही बोललं जात नाही. मग पुरुषांच्या बाबतीत देखील असं असतं का? त्यांच्यासाठी देखील बाबा बनण्याची योग्या पद्धत आहे का? मग असा जर प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर त्याचं उत्तर हो आहे.
तज्ज्ञांच्या मते पुरुषांचेही वडील होण्यासाठी योग्य वय असते, कारण तुम्ही योग्य वेळी वडील झाले नाहीत, तर तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक, ३० वर्षे पार केल्यानंतर पुरुषांच्या शुक्राणूंची संख्याही कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी, तुम्हाला वडील बनण्याची योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमचे जीवन आनंदी होईल.
चला तर मग याविषयी ग्रेटर नोएडा येथील GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ आयुषी यादव काय म्हणतातय हे जाणून घेऊ या.
पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या दररोज तयार होत असते, पण जसजसे वय वाढत जाते तसतसे त्याची संख्या आणि गुणवत्ताही कमी होत जाते, त्यामुळे 20 ते 30 वर्षे हे वडील बनण्यासाठी योग्य वय आहे, असे डॉ. आयुषी यांचे मत आहे.
याशिवाय पुरुष अनेक सप्लिमेंट खातात आणि इंजेक्शन घेतात, त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंची संख्याही प्रभावित होते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जीवनशैलीकडे लक्ष द्यावे लागेल.
या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
- धुम्रपान टाळा
- बाहेरील अन्नाचे सेवन कमी करा
-आपल्या आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा
- अल्कोहोलपासून अंतर ठेवा, याचा शुक्राणूंच्या संख्येवरही परिणाम होतो
- रोज व्यायाम करा
- योग्य आहार घ्या
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)