महिलांप्रमाणे पुरुषांनाही होतो मेनोपॉज; शरीरात होतात हे मोठे बदल
रजोनिवृत्तीच्या काळानंतर महिला प्रजनन करू शकत नाही. याचप्रमाणे पुरुषांमध्येही अशी परिस्थिती निर्माण होते.
मुंबई : महिलांची मासिक पाळी एका ठराविक वयानंतर बंद होते. या परिस्थितीला मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती म्हटलं जातं. रजोनिवृत्तीच्या काळानंतर महिला प्रजनन करू शकत नाही. याचप्रमाणे पुरुषांमध्येही अशी परिस्थिती निर्माण होते. याला Male Menopause म्हणून ओळखलं जातं.
महिला आणि पुरुष या दोघांमध्येही साधारणतः ही परिस्थिती वयाच्या 50 वर्षी येते. दरम्यान यांच्यात काही प्रमाणात समानता आढळून येते. या काळात महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स एस्ट्रोजन तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन यांची घट होते. पुरुष आणि स्त्रियांना या दोघांमध्येही मूड स्विंग तसंच राग येण्याचा अनुभव येतो.
यामध्ये काय फरक आहे?
मेनोपॉ म्हणजे मासिक पाळी बंद होते आणि त्यानंतर महिला आई बनू शकत नाही. मात्र पुरूषांमध्ये असं होत नाही. अशा परिस्थितीनंतर पुरुष वडील होऊ शकतात. मात्र टेस्टोस्टेरोन हार्मोनच्या कमतरतेमुळे त्यांना सेक्सदरम्यान समस्या येऊ शकतात.
मेनोपॉजदरम्यान पुरुषांना जाणवणारी लक्षणं
डिप्रेशन
आत्मविश्वासाची कमतरता
झोप न येणं
शरीरात फॅट वाढणं
सेक्स ड्राईव्ह कमी होणं
जर तुम्हाला ही लक्षणं दिसत असतील तर याचं निदान करण्यासाठी प्रथम डॉक्टरांशी संपर्क साधा. यानंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्या.