वंधत्व हे फक्त महिलांनाच जाणवतं असं नाही पुरुषांना देखील या समस्यांना सामारे जावं लागतं. तसेच एका रिसर्चनुसार, पुरुषांमधील Y गुणसुत्रे कमी होत चालली आहेत. असं असताना आतापासूनच पुरुषांनी आपल्या फर्टिलिटबाबत जागरुक असणे गरजेचे आहे. पुरुष वंध्यत्वामध्ये शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची खराब हालचाल, असामान्य आकारविज्ञान, शुक्राणूंची कमतरता, हार्मोनल असंतुलन, अनुवांशिक समस्या, अडथळा इत्यादीसारख्या अनेक समस्यांचा समावेश होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुकीची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, झोपेची पद्धत, जास्त ताण इत्यादी अनेक कारणांमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. याशिवाय अनेक प्रकारचे आजारही त्यांना त्यांचे पालक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यापासून रोखतात. काही सूचना देखील देण्यात आल्या होत्या ज्यांचे पालन पुरुष त्यांचे प्रजनन आरोग्य सुधारण्यासाठी करू शकतात.


मोबाइलपासून राहा दूर


नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या वाय-फाय सिग्नलचा देखील शुक्राणूंची गतिशीलता आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. स्मार्टफोनमधील निळा प्रकाश शरीराच्या नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार करण्याच्या क्षमतेस अडथळा आणतो. मेलाटोनिन शुक्राणूंना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. जे शुक्राणूंचे उत्पादन कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे. अशा परिस्थितीत मोबाईल पँटच्या खिशात ठेवणे टाळा.


(हे पण वाचाReport : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल) 


स्वच्छतेची काळजी घ्या


रोग आणि संक्रमण टाळण्यासाठी, स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, जसे की आंघोळ केल्यानंतर आपले हात स्वच्छ धुणे, गुप्तांगांच्या सभोवतालची स्वच्छता राखणे आणि श्वास घेण्यायोग्य फॅब्रिकपासून बनविलेले अंतर्वस्त्र आणि बॉटम्स घालणे.


संतुलित आहार


जंक आणि प्रोसेस्ड फूड आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. लठ्ठपणा, मधुमेह, उच्चरक्तदाब या आजारांसोबतच ते प्रजनन आरोग्यालाही हानी पोहोचवतात. अंडी, बेरी, अक्रोड आणि शक्य तितक्या फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा. त्यामध्ये प्रोटीन, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स सारखे पोषण असते, ज्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतेच पण प्रजनन क्षमताही वाढते.


हलका व्यायाम


थोडासा व्यायाम तुम्हाला एकंदर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतो. जर तुम्ही खूप व्यस्त असाल, तर फक्त 30 मिनिटांचा वेगवान चालणे अनेक रोगांचा धोका कमी करण्यासाठी आणि प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी पुरेसे आहे. हे देखील लक्षात घ्या की जास्त व्यायाम आणि जास्त वर्कआउट्स देखील शुक्राणूंची गुणवत्ता कमी करू शकतात.


मद्यप्राशन टाळा


जास्त धूम्रपान आणि मद्यपान केल्याने शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो. दररोज मद्यपान केल्याने टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे शुक्राणूंचे उत्पादन कमी होऊ शकते. दुसरीकडे, धूम्रपान केल्याने शुक्राणूंची गतिशीलता देखील कमी होते.