मुंबई : ब्रिटनमध्ये एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टसंदर्भात असं प्रकरण समोर आलं आहे ज्यामुळे डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. सेक्स दरम्यान या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट तीन सेंटीमीटर फ्रॅक्चर झाला आहे. मुख्य म्हणजे आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये प्रायव्हेट पार्ट हॉरिजॉन्टल पद्धतीने फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं होतं. मात्र हे असं पहिलं प्रकरण आहे ज्यामध्ये या व्यक्तीचं प्रायव्हेट पार्ट व्हर्टिकल पद्धतीने फ्रॅक्चर झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हाड नसतं मात्र त्या ठिकाणी क्रॅक येण्याची शक्यता असते. या व्यक्तीचं हे प्रकरण ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये छापण्यात आली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, यापूर्वीही अशी प्रकरणं आली आहेत मात्र त्यामध्ये प्रायव्हेट पार्ट हॉरिजॉन्टल पद्धतीने फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलंय.


मात्र यावेळी tunica albuginea मध्ये समस्या असल्याचं दिसून आलं आहे. हे इरेक्टाइल टिश्यूच्या आसपास एक अशी प्रोटेक्टिव्ह लेअर असते जे त्या भागाला रक्त पुरवठा करण्यास मदत करते. 


युरोलॉजिस्ट डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची प्रकरणं ही 88 टक्के सेक्स दरम्यान घडतात. प्रायव्हेट पार्ट ब्रेक होण्याची इतरंही काही कारणं आहेत ज्यामध्ये अधिकवेळा मास्टरबेशन आणि झोपण्याची एक विशिष्ट पोझिशन कारणीभूत ठरू शकते. 


डॉक्टर माहिती देताना म्हणाले, सामान्यतः प्रायव्हेट पार्ट हॉरिजॉन्टल पद्धतीने फ्रॅक्चर होताना क्रॅकचा आवाज येतो. मात्र या रूग्णाच्या प्रकरणामध्ये असं घडलं नाही. फ्रॅक्चर दरम्यान कोणताही आवाज आला नसल्याची माहिती आहे.


प्रायव्हेट पार्ट फ्रॅक्चर होण्याची अधिकतर प्रकरणं ही 40 वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येतात. या दुखापतीनंतर रूग्णाच्या प्रायव्हेट पार्टला सूजही येते. यावर 6 महिने उपचार घेतल्यावर रूग्ण लैंगिकदृष्ट्या पुन्हा सामान्य होतो.