Man swallows banana wrapped in a condom : आजकाल अनेकांना चिडचिडेपणा आणि राग (Angry) यांची समस्या दिसून येते. रागाच्या भरात अनेकदा व्यक्ती नको ती गोष्ट करून बसतात. अनेकदा रागात केलेल्या गोष्टीमुळे स्वतःला आणि इतरांनाही त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो. अशीच एक घटना अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तीसोबत घडली आहे. रागाच्या भरात या व्यक्तीने कंडोम (banana wrapped in a condom) लावलेलं संपूर्ण केळं गिळलं आहे. यानंतर त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्य म्हणजे, या व्यक्तीला पहिल्यांदा त्याने किती मोठी चूक केलीये, हे समजलं नाही. मात्र ज्यावेळी त्याला त्रास होऊ लागला तेव्हा उशीर झाला होता. अखेर डॉक्टरांच्या मदतीने कंडोम लावलेलं केळ पोटातून बाहेर काढलं आहे.


न्‍यूयॉर्क पोस्‍टच्या रिपोर्टनुसार, हे अशा पद्धतीचं पहिलंच प्रकरण असल्याचं म्हटलं जातंय. हे अशा पद्धतीचं प्रकरण होतं, ज्यावर डॉक्टरांनी पूर्णपणे अभ्यास केला आणि त्यानंतर क्युरियस मॅगझिनमध्ये याबाबत लेख पब्लिशही केला,


या प्रकरणाने डॉक्टर देखील हैराण


रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, 35 वर्षांच्या या व्यक्तीला कोणत्यातरी गोष्टीवर प्रचंड राग आला. आणि या रागाच्या भरामध्ये त्याने कंडोम लावलेलं संपूर्ण केळं गिळून टाकलं. या प्रकरणामुळे डॉक्टर देखील प्रचंड हैराण झाले आहेत. 


कंडोम असलेलं केळं गिळल्यानंतर त्या व्यक्तीला भयंकर पोटात वेदना होऊ लागल्या आणि उलट्या देखील झाल्या. यावेळी त्याला काहीही खाणं देखील शक्य होतं नव्हतं. पाणी पिण्यासही त्याला खूप त्रास होत होते. तो इतक्या अडचणीत होता की, 24 तासांपासून त्याला लघुशंका किंवा शौचालाही होत नव्हतं. त्याची प्रचंड बिघडलेली परिस्थिती पाहता, कुटुंबियांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं.


डॉक्टरांनी केला सिटी स्कॅन  


रूग्णाच्या गंभीर परिस्थिती डॉक्टरांनी त्याचं सीटी स्कॅन केलं. ज्यावेळी याचे रिपोर्ट्स समोर आले तेव्हा डॉक्टरांनाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. या व्यक्तीच्या आतड्यांजवळ कंडोममध्ये गुंडाळलेलं केळं त्यांना दिसून आलं. हे केळं आतड्यांचा रस्ता रोखून धरत होतं. 


डॉक्टरांनी घेतला शस्त्रक्रियेचा निर्णय


यावेळी डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जवळपास एक तास हे ऑपरेशन सुरु होतं. सर्जरीच्या तीन दिवसानंतर या रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. 


डॉक्टरांनी सांगितलं की, कंडोम असल्याकारणाने केळं तुटू शकत नव्हतं. त्यामुळे आतड्यांसाठी देखील ते पचवणं कठीण झालेलं. त्यामुळे या रूग्णाला असह्य वेदना होत होत्या. आता त्याला कसलीही तक्रार नाहीये. तो आरामात सर्व खाऊ शकतो.