Mango leaf Benefits for weight loss : देशभरात सणाचे दिवस सुरु आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायचे आगमन होणार आहे. त्यानंतर नवरात्र, दसरा आणि मग दिवाळीचा सण...अशात तुमचे वाढलेले वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय. घरात शुभ कार्य असेल तर आपण आर्वजुन आंब्याची पानं आणतो. ही पानं शुभ कार्यासाठी शुभ मानली जातात. पण तुम्हाला माहितीये या आंब्याचा पानाचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत ते...आंब्याच्या पानांमध्ये  काही औषधी गुणधर्म आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या पानांचा आयुर्वेदात अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. वजन कमी करण्यासाठी ही पानं खूप गुणकारी आहे. 


वजन कमी करण्यासाठी असा करा आंब्याता पानांचा वापर!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेल्थलाइननुसार, आंब्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, वनस्पती संयुगे, पॉलिफेनॉल, टेरपेनॉइड्स इ. प्रतिकारशक्ती आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी टेरपेनॉइड्स आढळतं. ते तुमच्या पेशींचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करतं. पॉलिफेनॉलमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे पोटात चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देतात. तसंच लठ्ठपणा, मधुमेह, कॅन्सर आणि हृदयविकारापासून बचाव करण्यास फायदेशीर ठरतात.


आंब्याच्या पानांचा अर्क चरबीच्या चयापचयात हस्तक्षेप करून लठ्ठपणा, मधुमेह आणि चयापचय सिंड्रोम व्यवस्थापित करण्यात मदत करण्यास उपयुक्त ठरतं. प्राण्यांवर केलेल्या अनेक अभ्यासातून असं दिसून आलंय की आंब्याच्या पानांचा अर्क ऊतींच्या पेशींमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतो. जर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार असाल तर तुम्ही आंब्याच्या पानांचा चहाचे सेवन करु शकता. 


वजन कमी करण्यासाठी आंब्याची पानं उत्कृष्ट ठरतात. या पानांचा अर्क मधुमेह आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यात अनेक प्रकारचे संयुगे असतात, जे चयापचय क्रिया सुधारतात. फ्लेव्होनॉइड्स चयापचय सुधारण्यासाठी ओळखले जातात. यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. तुमची रुंद कंबर पातळ होऊन तुमचे पोट आतामध्ये जातं. 


आंब्याची पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी साखरेची पातळी स्थिर राहणे अतिशय महत्त्वाचं आहे. आंब्याच्या पानांमध्ये असलेली संयुगे इंसुलिन संवेदनशीलता सुधारून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. आपल्या आहारात आंब्याच्या पानांचा समावेश केल्यास भूक कमी लागते. 


वजन कमी करण्यासाठी पचनशक्ती चांगली असणे गरजेचे असतं. यामध्ये आंब्याची पाने महत्त्वाची भूमिका निभावतात. आंब्याच्या पानांमध्ये असलेले फायबर विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि निरोगी पचनास प्रोत्साहन देते.


आंब्याच्या पानांमध्ये असे काही गुणधर्म असतात जे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करतात. हे महत्वाच्या अवयवांभोवती जमा झालेली चरबी आणि व्हिसेरल फॅट कमी करण्यास मदत करते. यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका वाढतो.


आंब्याचा पानांचा आहारात असा करा समावेश 


तुम्ही चहामध्ये आंब्याची पानं टाकू त्याचे सेवन करु शकता. त्याची ताजी पानं सूप आणि भाज्यांच्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही टाकू शकता. 2-3 आंब्याची पानं 2 कप पाण्यात टाकून उकळा. ते निम्मे झाल्यावर गाळून घ्या. चव आणण्यासाठी आपण थोडे मध आणि लिंबाचा रस घालू शकता. ही पानं उन्हात वाळवून पावडर बनवा. तुम्ही ते सूप आणि पेयांमध्ये मिसळूनही पिऊ शकता.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)