मुंबई : अनेकदा दूधात हळद किंवा सब्जा घालून पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला खूप फायदा मिळतो. दूधात असाच एक गुणकारी पदार्थ मिसळला जातो तो म्हणजे कलौंजी (Nigella Seeds). कलौंजी दूधात घालून प्यायल्याने अतिशय फायदा होतो. काळ्या रंगाचे हे बी एँटीऑक्सीडेंट्स, कॅल्शियम, ऑयरन, कॉपर, फॉस्फोरस आणि फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असते. 


कलौंजीच्या दुधाचे फायदे 


१. पुरूषांची ताकद वाढते 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कलौंजीचे दूध (Nigella Seeds with Milk) विवाहित पुरुषांची मर्दानी कमजोरी दूर करते. तसेच प्रजनन क्षमता वाढवण्यास मदत करते. त्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे लैंगिक जीवन सुधारतात.



२. इम्युनिटी वाढणार


कलौंजीच्या दुधामुळे तुमचा स्टॅमिना आणि इम्युनिटीचे फायदे अधिक आहेत. हे दूध प्यायल्यामुळे एनर्जी वाढते. एँटीऑक्सीडेंट गुणांमुळे तुम्ही ऋतुच्या बदलामुळे होणाऱ्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. 


३. वजन कमी करण्यासाठी भरपूर फायदेशीर 


वजन कमी करण्यासाठी कलौंजीच्या दूधाचा खूप फायदा होतो. यामुळे मेटापॉलिझम वाढते आणि पजन क्षमतेकरताही फायदा होतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर कलोंजी घातलेले दूध प्यावे. 


४. गर्भवती महिलांसाठी अतिशय फायदेशीर 


गर्भवती महिलांनाही कलोंजीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे महिलांमध्ये रक्त कमी होत नाही. तसेच गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या हाडांचा विकास होण्यास मदत होते.