मुंबई : कोरोना व्हायरसचा धोका अद्याप टळलेला नाही. दरम्यान या काळात तज्ज्ञांनी नवीन सुपर स्ट्रेनच्या धोक्याची भीती व्यक्त आहे. इम्युनॉलॉजिस्टांना भीती वाटते की कोविड -22 सुपर स्ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक असू शकतो. शिवाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येत्या काळात याची काही प्रकरणं समोर येऊ शकतात.


डेल्टापेक्षाही हा धोकादायक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोविड-22 स्ट्रेन हा डेल्टा वेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक बनू शकतो. आतापर्यंत, कोरोनाचा डेल्टा प्रकार सर्वात धोकादायक आणि संसर्गजन्य मानला जातो. परंतु तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, 'कोविड -22' नावाचे नवीन रूप सध्याच्या सर्वात घातक डेल्टा प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असू शकतं.


2022 मध्ये येणार कोरोनाचा नवा वेरिएंट?


कोविड -22 हे नाव किंवा हा शब्द सर्वप्रथम स्वित्झर्लंडच्या ईटीएच ज्यूरिख उथल्या Systems and Synthetic Immunology सहयोगी प्राध्यापक साई रेड्डी यांनी वापरला होता. एका अहवालानुसार, साई रेड्डी यांनी इशारा दिला आहे की 2022 मध्ये कोविडचं नवीन रूप दिसू शकतं आणि ते एक मोठा धोका ठरू शकतो.


लसीचा प्रभाव


इम्युनोलॉजिस्ट डॉ.  रेड्डी यांनी अशी भीती व्यक्त केली की नुकतेच समोर आलेले कोरोनाचे स्ट्रेन एकत्र मिळून नवा धोका पुढे आणू शकतात. याशिवाय लस यावर जास्त प्रभावी ठरणार नसल्याची शक्यता डॉ. रेड्डी यांनी व्यक्त केली आहे.


ब्लिक या जर्मन वृत्तपत्राशी बोलताना प्रोफेसर रेड्डी यांनी डेल्टाचे नाव कोविड -21 असं ठेवलं आणि सांगितलं की, हा सध्याचा सर्वात संसर्गजन्य प्रकार आहे. जर बीटा किंवा गामा प्रकार अधिक संसर्गजन्य बनले किंवा डेल्टा म्युटेशन विकसित करेल. आणि असं झाल्यास तो महामारीचा एक नवा टप्पा असू शकतो.


लस न घेणारे सुपर स्प्रेडर


येत्या काळात ही एक मोठी समस्या बनू शकते. डॉ. रेड्डी म्हणाले की, अलीकडे झालेल्या अभ्यासाचे निकाल दर्शवतात की, डेल्टा वेरिएंट व्हायरल लोड खूप जास्त आहे. जर एखादी व्यक्ती ज्याने लस घेतलेली नाही आणि इतर व्यक्ती त्याच्या संपर्कात आली, तर तो सुपर स्प्रेडर बनू शकतो.