Measles Outbreak In Mumbai  : मुंबईत गोवरची साथ ( Measles ) आली असून आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गोवरच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे. गोवर संक्रमण असलेल्या भागात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच आरोग्य शिबिरंही घेतली जात आहेत. गोवर प्रादुर्भावाचा आढावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीनेही घेतला आहे. या समितीने गोवंडी भागात पाहणी केली.  


मुंबईकरांची चिंता वाढली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गोवरच्या साथीनं डोकं वर काढले आहे मुंबईत गोवर या संसर्गजन्य आजाराचे आतापर्यंत 74 रुग्ण आढळले आहे. वेळीच उपचार न झाल्यास मृत्यूही होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाकाळात काही बालकांना गोवरची लस न मिळाल्याचे परिणाम असू शकतात असं तज्ज्ञांचं मत आहे.


मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी


गर्भवती महिलांनाही याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व बालकांना गोवरची लस वेळेत द्यावी असं आवाहन करण्यात आले आहे. आरोग्यव्यवस्थेत या आजारावरील गोवरची लस घेणे हाच पर्याय आहे, असे म्हटले आहे.  


गोवर आजाराची ही आहेत लक्षणं 
 
- गोवर हा विषाणूपासू होणारा आणि संसर्गजन्य आजार आहे


- गोवर शिंकण्यातून किंवा खोकल्यातून पसरतो


- अंगावर लाल पुरळ आणि ताप येतो


- गोवरमुळे खोकला येतो, दोन आठवडे खोकला कमी होत नाही


- रुग्णांचे डोळे येतात


- आजार झालेल्या मुलांमध्ये 'अ' जीवनसत्वाची कमी असल्याने डोळे येतात


गोवार हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. गोवर सुरक्षित आणि प्रभावी लसी उपलब्ध असूनही जगभरात अजूनही लहान मुलांचा मृत्यू होत आहे. ही चिंतेची बाब आहे. Measles हा मुलांमध्ये आढळणारा एक गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे. गोवरची लक्षणे खोकला लागणे, शिंकणे ही प्रामुख्याने सांगितली जातात. किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने देखील गोवर पसरतो.


गोवर या आजाराची मुंबईत पुष्टी झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. लहान मुलांना हा जार होऊ शकतो. आणि जिवाला धोका पोहोचू शकतो. खोकणे आणि शिंक यामुळे या आजाराचा फैलाव होतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो. त्यांच्यापासून दुसऱ्या मुलांना हा आजार जडतो. या आजारामुळे गंभीर कुपोषण, निमोनिया आणि मेंदुला ताप चढतो. शरीरावर लाल डाग दिसतात, नाक वाहत राहते. डोळे येणे ही याची लक्षणे आहेत.