Measles Outbreak in Mumbai: मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळत होते. हा प्रादुर्भाव वाऱ्याच्या वेगानं मुंबईत देखील (Measles in mumbai) पसल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर आता प्रौढ लोकांना देखील त्यामुळं धोका उदभवू लागला आहे. अशातच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.


मुंबईमध्ये गोवरचं थैमान (Measles Outbreak)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत गोवरमुळे आणखी एका मुलाचा मृत्यू (measles death child) झाल्याची माहिती हाती आली आहे. नालासोपारा येथील एक वर्षीय मुलाचा आज उपचारा दरम्यान मुंबईत मृत्यू झालाय.त्यामुळे आता मुंबईत गोवरमुळे मृत बालकांची संख्या पोहचली 11 वर पोहोचली आहे. अशातच आता मुंबईत सध्या गोवर रूग्णांची संख्या (Total Patient) पोहचली 220 वर पोहचली आहे.


गोवरची बाधा होण्यात सर्वाधिक प्रमाण लहान बालकांचं (measles child) आहे. त्यात आता 6 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांनाही गोवरची लागण होत आहे. त्यामुळे तुमच्या लहानग्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानं लस द्या (vaccine) आणि काळजी घ्या, असं आवाहन देखील करण्यात आलंय.


आणखी वाचा - Measles Outbreak in Mumbai:  गोवरमुळे सव्वा वर्षाच्या मुलीचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर


दरम्यान, गोवरची लागण केवळ लहान मुलांमध्येच नसून प्रौढांमध्येही या संसर्गाची ( Measles infection in adults )  लागण होताना दिसतंय. रुग्णांना लक्षणाधारित उपचारासह अ जीवनसत्त्वाची (Vitamin A) मात्रा देण्यात आली. आता या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र गोवराच्या संसर्गाची लागण लहान बालकांप्रमाणे प्रौढांमध्येही होतेय का?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.