मुंबई : उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो. खरबुजामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि आजारांपासून संरक्षणही मिळतं. कारण, खरबुजात ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खरबूज आरोग्यास लाभदायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय फायदे आहेत खरबुजाचे...


-  जर अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो.
-  खरबुजात मोठ्या प्रमाणात अ‍ॅंटी ऑक्‍सीडेंट, व्हिटामिन्‍स `सी` आणि `ए` मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे खरबूज मोठ्या प्रमाणात आहारात घेतल्‍यानंतर त्‍वचा उजळ   होते.
-  खरबुजामध्‍ये आर्गेनिक पिगमेंट कॅरोटीनाइड प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्‍यामुळे कॅन्‍सरसारख्‍या रोगापासून बचाव करता येतो.
- खरबूजामध्‍ये अ‍ॅडेनोसीन असल्‍यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होतं. यामुळे आरोग्‍य निरोगी आणि सुरक्षीत राहतं.
-  कफ झाला असेल, पचन होत नसेल, तर खरबूज शरीरासाठी लाभदायक ठरते. त्‍वचामध्‍ये कनेक्‍टीव टिशू असतात. शरीरातील टिशूंची सुरक्षा करण्‍याचे काम   खरबूजातील घटक करतात. यामुळे शरीरावरील जखमा लवकर बऱ्या होतात. चेहराही उजळतो.
-  खरबूजामध्‍ये व्हिटामीन बी असल्‍यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्‍यासाठी मदत होते. साखर आणि कार्बोहाइड्रेट संतुलीत करण्‍याचे काम खरबूज करतात.