Male Breast Cancer: मेल ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे पुरुष स्तनांच्या कर्करोगाच्या घटना (MBC) सर्व स्तनाच्या कर्करोगाच्या घटनांपैकी 0.5 - 1% आहेत असा अंदाज आहे. अलीकडील विविध अभ्यासांनुसार, या घटना हळूहळू वाढत आहेत आणि यामुळे त्यासाठी जागरूकता पसरवण्याची गरज निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्त्रियांच्या Metastatic Breast Cancer चं निदान सामान्यतः वाढत्या वयात केलं जातं. मात्र  पुरुष त्यांच्या स्तनांमध्ये कोणतीही गाठ किंवा सूज याकडे दुर्लक्ष करतात. हा वृद्ध पुरुषांचा आजार मानला जाऊ शकतो.  


2020 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आलंय की, एका गटातील सुमारे 81% पुरुषांना MBC ची लक्षणं आणि लवकर किंवा वेळेवर ओळखण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात
याबद्दल माहिती नव्हती. 


अहमदाबादच्या न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन (NCGM) ने ब्रेस्ट कॅन्सरच्या जागरूकतेचं सर्वेक्षण केलं. यावेळी त्यांना आढळले की, 231 व्यक्तींच्या गटातील सुमारे 78% व्यक्ती (पुरुष आणि स्त्रिया) MBC बद्दल अनभिज्ञ आहेत. सध्याच्या काळात म्हणून MBC चे जोखीम घटक, रोगनिदान आणि लवकर व्यवस्थापन समजून घेणे महत्वाचे आहे.


मॉलिक्युलर ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट डॉ. कुंजल पटेल म्हणाल्या की, ब्रेस्ट कॅन्सरला कारणीभूत जीवनशैलीचे घटक, कौटुंबिक इतिहास आणि आनुवंशिकता यासह अनेक जोखीम घटक आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, कौटुंबिक इतिहास, इस्ट्रोजेनची उच्च पातळी, आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम सारख्या विशिष्ट गुणसूत्र विकृती असलेल्या पुरुषांमध्ये MBC दिसून येतो. स्तनाचा कर्करोग होणाऱ्या सुमारे 20% पुरुषांना स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असू शकतो.


ASCO च्या शिफारशींनुसार, स्तनाचा कर्करोग असलेल्या पुरुषांना BRCA1 आणि BRCA2 आणि इतर अनुवांशिक कर्करोगाच्या जोखीम जनुकांसाठी अनुवांशिक समुपदेशन आणि अनुवांशिक चाचणी दिली पाहिजे. स्तनाच्या कर्करोगाची तपासणी, विशेषत: सकारात्मक कौटुंबिक इतिहासासह, त्याचे फायदे आहेत.स्क्रीनिंगमुळे तुम्हाला आजार होण्यापूर्वीच निदान होण्यास मदत होते आणि त्या बदल्यात वेळेत योग्य उपचार मिळण्यास मदत होते. तुमच्या कुटुंबातील  सदस्यांना कर्करोगाने ग्रस्त असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या जोखमीबद्दल चर्चा करा.