पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Men sweat attracts women News In Marathi : महिला पुरुषांकडे का आकर्षित होतात यावर अनेकदा चर्चा होते. असे म्हटले जाते की पुरुषांच्या कोणत्या गोष्टी किंवा वागणं महिलांना आकर्षित करतं हे एक गूढ आहे. पुरुषांबद्दलच्या काही गोष्टी स्त्रियांना सर्वाधिक आकर्षित करतात. ते काय आहेत? अनेकदा आपण अशा काही गोष्टी करतो ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत, पण त्या इतरांना आकर्षित करतात. पुरुषांच्या काही सवयी महिलांना खूप आकर्षित करतात. अशातच महिलांबाबतीचा एक धक्कादायक खुलासा एका संशोधनातून करण्यात आला.
एखाद्या महिलेला पुरुषांचा सुगंधित परफ्यूम, ड्रेसिंग स्टाईल, पर्सनालिटी, राहणीमान इत्यादींसारख्या गोष्टी आवडू शकतात. पण जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटल की, महिला या पुरुषांच्या घामाच्या वासाला आकर्षित होतात. असा धक्कादाय खुलासा संशोधनातून करण्यात आला आहे. इतर सजीवांप्रमाणेच माणसांनाही घाम येतो आणि त्याला एक विशेष वास असतो. ज्याचा विपरीत लिंगाच्या (पुरुष/स्त्री) शरीरावर परिणाम होतो.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले येथील संशोधकांना असे आढळून आले की, पुरुषांच्या घामामध्ये आढळणारा अँड्रॉस्टेडिएनोन हा विशेष घटक महिलांमध्ये कोर्टिसोलची पातळी वाढवतो. कॉर्टिसॉल हा तणाव संप्रेरक आहे. परंतु विशेष म्हणजे स्त्रियांमध्ये त्याची वाढ त्यांच्या मनःस्थितीवर आणि लैंगिक उत्तेजनावर देखील परिणाम करू शकते.
अनेक पुरुष स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतात; पण काही जण असे प्रयत्न अजिबात करत नाहीत. ही गोष्ट महिलांना खूप आकर्षित करते. स्त्रिया अशा पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात जे सुरुवातीला कोणतेही उद्दिष्ट देत नाहीत किंवा अगदी कमी उद्दिष्ट देतात, हे संशोधनातूनच स्पष्ट झाले आहे.
तसेच संशोधकांनी महिलांना हा विशेष रासायनिक पदार्थ पुरुषांच्या घामातून वास घेण्यासाठी दिला. यानंतर महिलांच्या रक्तातील कोर्टिसोलची पातळी मोजण्यात आली. परिणामी, संशोधकांना असे आढळून आले की, ज्या स्त्रियांना या सुगंधाचा वास येतो त्यांच्यामध्ये कोर्टिसोलची पातळी वास न घेतलेल्या स्त्रियांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असते.
या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. क्लेअर व्हायर्ट म्हणतात की, हे संशोधन मानवांमध्येही वासाद्वारे सिग्नल एक्सचेंज (फेरोमोन कम्युनिकेशन) होत असल्याचा पुरावा आहे. उदाहरणार्थ, उंदीर आणि फुलपाखरांमध्ये, वासाद्वारे सिग्नलची देवाणघेवाण होते आणि त्यांच्या वर्तनावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे, आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी सुगंध विरुद्ध लिंगावर देखील जैविक आणि कदाचित मानसिकदृष्ट्या प्रभाव टाकू शकतो. या संशोधनासाठी अधिक सखोल अभ्यास आवश्यक आहे. तरीही, हा अभ्यास या वस्तुस्थितीकडे निर्देश करतो की मानवी आकर्षण ही एक जटिल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वास देखील महत्त्वाची भूमिका बजावते.