दर महिन्याला साधारण  21 दिवसांच्या अंतराने महिलांना पाळी येते. मासिकपाळी दरम्यान पोटात दुखणं आणि पायात क्रॅम्प येणं अशा शारीरिक आजारांप्रमाणे मानसिक त्रासाला ही महिला सामोऱ्या जात असतात. मासिक पाळी सुरु असताना चिडचिड होणं, रडावसं वाटणं असे महिलांचे मुड स्विंग्ज होत असातात. त्याच प्रमाणे चाळीशीत आल्यावर मेनेपॉज सुरु होताना महिलांमध्ये शारीरिक बदलांप्रमाणे मानसिक बदलही मोठ्या प्रमाणात होत असतात. चाळीशी नंतर शरीरात हार्मोनल बदलतात, महिलांना मेनोपॉज  साधारण वायाच्या 40 ते 45 वर्षात येतो. याचा जास्त परिणाम हा मानसिक आरोग्यावर दिसून येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहेत लक्षणं ? 
मेनोपॉज सुरु होताना कामात लक्ष न लागणं, सतत चिडचिड होणं, यांसारखे मानसिक बदल शरीरात दिसून येतात. त्याचप्रमाणे भूक न लागणं,थकवा येणं, आणि अशक्तपणा जाणवणं यांसारख्या शारीरिक समस्या होणं ही मेनोपॉजची लक्षणं समजली जातात. मासिकपाळी हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर असताना महिलांना याचं दडपण येतं. त्यामुळे बऱ्याच जणी नैराश्यात जातात. जसं मासिकपाळी सुरु होते तसंच कालांतराने ती हळूहळू बंद होते ही अत्यंत नैसर्गिक बाब आहे. त्यामुळे हे शारीरिक बदल स्विकारणं गरजेचं आहे. 


व्यायाम आणि आहार 
अशावेळी स्वत:ला वेळ देणं गरजेचं आहे. स्वत:वर प्रेम करणं, स्वत:ची काळजी घेणं त्याचप्रमाणे आवडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.  मेनोपॉज सुरु असाताना डिप्रेशनपासून दूर राहण्यासाठी योगा आणि ध्यान करणं फायदेशीर ठरतं.  ध्यान केल्याने मानसिक स्थिती सुधारते. मानसिक संतुलन राखण्यासाठी मेडीटेशन बरोबरचं योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे. घरातील सात्विक अन्न आणि ताज्या फळांचं सेवन करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन करणं टाळावं. यामुळे हार्मोनल बदलांचा फार परिणाम शरीरावर होत नाही. मेनोपॉजमध्ये येणाऱ्या डिप्रेशकडे दुर्लक्ष न करता, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. या दिवसात चिंता तणाव आणि शारीरिक कष्ट घेणं टाळावं असं डॉक्टरांकडून सांगितलं जातं. मुबलक पाण्यामुळे मानसिक ताण तणाव दूर होण्यास मदत मिळते. तसंच या दिवसात  दिवसात भरपूर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते.