काही लोक खूप खावूनही सडपातळ कसे राहतात?
खूप खावूनही सडपातळ, बारीक, फ्लॅट बेली आणि स्लिम लोकं तुम्ही पाहिली असतील.
मुंबई : खूप खावूनही सडपातळ, बारीक, फ्लॅट बेली आणि स्लिम लोकं तुम्ही पाहिली असतील. त्यांना पाहुन तुम्हाला अनेकदा आश्चर्यचा धक्का बसत असेल आणि काही वेळस त्यांचा हेवाही वाटत असेल. पण तुम्हाला माहित आहे का? याचे नेमके कारण काय आहे? तर एकच मेटाबॉलिझम. तर अशा खूप खावूनही स्मिल राहणाऱ्या लोकांचे मेटाबॉलिझम इतरांपेक्षा चांगले असते, फास्ट असते. कदाचित हे त्यांना लाभलेले वरदान असू शकते. कारण हे मेटाबॉलिझम आपल्याला जन्मापासून लाभते. एकतर ते मंद असते किंवा जलद. पण ते काही प्रयत्नांनी बदलता येऊ शकते.
काय आहे मेटाबॉलिझम?
हाताच्या छापांप्रमाणे मेटाबॉलिझमही प्रत्येकाचे वेगळे असते. मेटाबॉलिझम तुमचे वजन वाढवतो किंवा कमी करतो. याचे काही ठराविक प्रमाण नाही आहे. मेटाबॉलिक रेट म्हणजे जेव्हा तुम्ही आराम करत असता तेव्हाही शरीर सक्रिय असते, काम करत असते. पेशी वाढतात, मृत पावतात. अन्नाचे पचन होते आणि त्याचे ऊर्जेतही रुपांतर होते. मेटाबॉलिक रेट कमी असल्यास अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात आणि वजन वाढू लागते. याउलट चांगले मेटाबॉलिक रेट असलेली व्यक्तीच्या अधिक कॅलरीज बर्न केल्या जातात.
मेटाबॉलिक रेट सुधारण्यासाठी काही उपाय
जर तुम्हाला तुमचा मेटाबॉलिक रेट चांगला करायचा असल्यास सोपा उपाय म्हणजे संतुलित आहार घ्या. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कार्बोहायड्रेट्स युक्त आहार कमी प्रमाणात घ्या आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यायला सुरुवात करा.
त्याचबरोबर तुमच्या झोपेच्या वेळा, ताण तणाव या सर्वांचा मेटाबॉलिझमवर परिणाम होतो.
त्यामुळे इतरांशी तुलना करणे टाळा आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या.