मुंबई : आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे पाणी पिणं हे गरजेचं आहे. पाणी शरीरासाठी औषधाप्रमाणे असतं. मात्र शरीराला योग्य तो फायदा होण्यासाठी पाणी पिताना चुका करणं टाळलं पाहिजे. यासाठी पाणी पाणी पिण्याची योग्य पद्धत माहिती असली पाहिजे.


पाणी पिताना या चुका करणं टाळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला तहान लागल्यावर तुम्ही भरपूर पाणी पिता का? असं करणं टाळा. पाणी पिणं ही चांगली सवय आहे. मात्र एकाचवेळी भरपूर प्रमाणात पाणी पिऊ नका. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिण्याचा सल्ला केला जातो. जेव्हा एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी शरीरात पोहोचतं तेव्हा ते इलेक्ट्रोलाइट्स पातळ करते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवते. यामध्ये सोडियमची पातळी कमी होऊ लागते. 


उभं राहुन पाणी पिणं


आयुर्वेदानुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पोटावर जास्त दाब पडतो, कारण उभं राहून पाणी प्यायल्यास अन्ननलिकेद्वारे दाबाने पाणी पोटात लवकर पोहोचतं. यामुळे पोट आणि पोटाभोवतीची जागा आणि पचनसंस्थेचं नुकसान होतं.


थंडगार पाणी पिणं


कडाक्याच्या उन्हात फ्रिज उघडून थंडगार पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. याने तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं असलं तरीही हे हानिकारक आहे. यामुळे मज्जातंतूला हानी पोहोचवू शकते.