मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन ही एक अशी गोष्ट आहे. ज्याच्याशिवाय आपण कधीही राहू शकत नाही. स्मार्टफोन आपल्या इतका गरजंचा झाला आहे की, लोकांना उठता, बसता, कुठे ही गेलं तरी तो त्यांना जवळ लागतोच. लोकांकडे फोन नसेल, तर त्यांना वेड लागल्यासारखे वाटते. प्रत्येक लहान-मोठ्या गरजांसाठी फोन अतिशय उपयुक्त आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये असे काही फिचर्स आहेत. जे आपल्याला फार मदत करतात. ज्यामुळे लोक सगळ्याच गोष्टींसाठी फोनवर अवलंबून राहातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला माहितीय का, यामुळे तुमच्या आरोग्याचे फार मोठे नुकसान होऊ शकते. आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण स्मार्टफोनला चिकटले आहेत, ज्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.


बऱ्याच लोकांना हे कळंत आहे की, त्यांची ही सवय चांगली नाही आणि त्यांना ती सोडायची असते, परंतु कितीही प्रयत्न केला तरी मात्र लोकांना या सवयी सोडता येत नाही. तुमच्या सोबत देखील असंच काहीसं होत असंल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही समस्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही लगेच फोन वापरणं सोडू शकता.


डोळ्यांना होणारे नुकसान


मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळ्यांवर ताण येतो. काहीवेळा आपल्याला ते कळत नाही, परंतु यामुळे आपल्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.


यामुळे गंभीर डोकेदुखी, डोळा दुखणे आणि डोळे कोरडे होऊ शकतात. अशा परिस्थितीत, सेल फोन वापरताना ब्रेक घेणे खूप महत्वाचे आहे.


मनगटात वेदना होऊ शकतात


कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर हे वाईटच. त्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तु म्हटली तर ती वापरताना आपण सावधगिरी बाळगणे चांगले. फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना होऊ शकतात.


यामुळे मनगटात मुंग्या खील होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला हातावरती ताण येईल आणि दुसरं काम करताना तुम्हाला त्रास उद्भवू शकतो.


मुरुमांचे कारण बनू शकते


तुम्हाला माहित आहे का की फोनच्या हानिकारक किरणांमुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास उद्भवू शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मोबाईलमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया असतात जे तुमच्या त्वचेवर येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर डाग येऊ शकतात. तसेच ते अकाली वृद्धत्वाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा मोबाईल रोज पुसून स्वच्छ करा.


झोपेची पद्धत बिघडते


झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेची वेळ कमी होते. यामुळे तुम्हाला सकाळी फ्रेश वाटत नाही तसेच दिवसा झोपही येते. मोबाईलच्या अतिवापरामुळेही कधी कधी निद्रानाश होतो. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यासह तुमच्या कामावर देखील होतो.


तणाव वाढू शकतो


प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तणाव येतच असतो. परंतु बऱ्याचदा अनेक गोष्टी फोनमध्ये वाचल्याणे, ऐकल्याने, जासत ताणाव येतो. ज्याचे नंतर गंभीर आजारात रुपांतर होऊ शकते.