मुंबई : लस उत्पादक Moderna ने अमेरिका आणि जर्मनीच्या कोर्टात Pfizer-Biontech विरुद्ध खटला दाखल केला आहे. Pfizer-Biontech ने कोरोना विरुद्ध बनवलेली m-RNA लस Moderna च्या तंत्रज्ञानाची नक्कल करून बनवली आहे असा दावा Moderna ने केला आहे.


कंपनीने आधीच पेटंट घेतलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Moderna च्या मते, m-RNA लस तयार करण्याचे तंत्रज्ञान 2010 ते 2016 दरम्यान पेटंट करण्यात आलं होतं. त्याच्याद्वारेच फायझर-बायोनटेकने मॉडर्नाच्या परवानगीशिवाय कॉमिर्नाटी ही लस तयार केली.


स्पाइकवॅक्स या तंत्रज्ञानापासून तयार


तसंच मॉडर्नाने सांगितलं की, त्यांची कोरोना विरुद्धची लस, स्पाइकवॅक्स या तंत्रज्ञानातून बनवली आहे. जारी केलेल्या निवेदनात मॉडेर्नाने म्हटलंय की, कोरोना युगाच्या एक दशक आधी मॉडर्नाने अब्जावधी डॉलर्स खर्च करून या तंत्रज्ञानाचा शोध लावला होता आणि त्याचं पेटंट घेतलं होतं. पण कोरोना महामारीच्या काळात Pfizer-Biontech ने हे तंत्रज्ञान चोरून स्वतःची लस बनवली.


मॉडेर्नाकडून स्पष्टता 


आपल्या विधानात, Moderna ने हे देखील स्पष्ट केलंय की, फायझर-बायोनटेकची लस कॉमिर्नाटी बाजारातून काढून टाकली जावी किंवा भविष्यात तिच्या निर्मिती किंवा विक्रीवर बंदी घालण्यात यावी.