Monkeypox Name Change: कोरोनाच्या (Corona) विळख्यातून जगाची सुटका होत नाही, तोच आणखी एका आजारानं नाकी नऊ आणले. या आजाराचाही प्रादुर्भाव संपूर्ण जगाला संकटाच्या गर्त छायेत लोटून गेला. तो आजार म्हणजे मंकीपॉक्स (Monkeypox). विविध देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका बळावत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेकडून एक लक्ष वेधणारं ट्विट करत त्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. (Monkeypox New Name by who latest health Marathi news )


काय आहे ही नवी माहिती? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO कडून Monkeypox चं नवं नाव नुकतंच जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये सदरील आजारासाठीच्या नव्या नावावरूनही पडदा उचलत त्यामागील कारणंही स्पष्ट करण्यात आलं आहे. यापुढे मंकीपॉक्सचं नाव असणार आहे  'एमपॉक्स' (mpox). येणाऱ्या वर्षात या दोन्ही नावांचा वापर केला जाणार आहे. ज्यानंतर मंकीपॉक्स हे नाव टप्प्याटप्प्यानं हटवण्यात येईल. 


हेसुद्धा वाचा : Weight Loss Tips : Protein Shake की Green Tea नेमकं वजन कशामुळे आटोक्यात येतं?


यंदाच्या वर्षी ज्यावेळी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळालं, त्यावेळी अनेकांनीच वर्ण, जात, पंथ या मुद्द्यांवरुन आक्षेपार्ह वक्तव्य करत हिणवलं गेलं. WHO पर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या आणि यानंतर चिंता व्यक्त करत या आजाराचं नाव बदलण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेनं घेतला. 


यापुढे नेमकं कोणतं नाव वापरायचं? 


बऱ्याच निरिक्षणांनंतर WHO या निर्णयावर पोहोचलं आहे की, मंकीपॉक्स या आजारासाठी एका नव्या नावाचा वापर सुरु केला जाणार आहे. हे पर्यायी नाव असेल, एमपॉक्स. ही दोन्ही नावं येत्या दिवसांमध्ये वापरात असतील. पण, कालांतरानं मंकीपॉक्स हे नाव मात्र हटवण्यात येईल. पुरुषांची आरोग्य संघटना REZO नं यासाठीचा प्रस्ताव दिला होता. 



जगभरात आतापर्यंत एमपॉक्सचे किती रुग्ण? 


जगभरात विविध ठिकाणी एमपॉक्सचे रुग्ण आढळले. विविध लक्षणं असणाऱ्या या आजारामध्ये काहींना शरीरावर बारीक पुरळ, ताप, थंडी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणं दिसली होती. संपूर्ण जगात आतापर्यंत 80 हजारांहून अधिक रुग्णांना या आजारानं विळख्यात घेतलं असून, 55 जणांचा यात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.