मंकीपॉक्सची आणखीन दोन लक्षणं आली समोर, पाहा काय सांगतोय अहवाल
178 देशांमध्ये मंकीपॉक्सचं थैमान, या लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
मुंबई : कोरोनासोबत मंकीपॉक्सनंही थैमान घातलं आहे. 78 देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. भारतातही मंकीपॉक्सची एन्ट्री झाली आहे. मंकीपॉक्सचे 18 हजारहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य विभागाने अलर्ट दिला आहे.
ताप, डोकेदुखी, शरीरावर रॅश उठणे किंवा फोड येणं या लक्षणांसोबत आता आणखी दोन नवीन लक्षणं मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिसून आली आहेत. त्यामुळे ही चिंतेची बाब असून लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन केलं आहे. यामध्ये कोणती दोन नवीन लक्षणं समोर आली जाणून घेऊया.
एका अहवालात मंकीपॉक्स आजाराची दोन नवीन लक्षणं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं लक्षणं रेक्टल म्हणजे गुदद्वारात दुखणं आणि दुसरं पेनाइल एडिमा असे दोन लक्षण समोर आले आहेत. मंकीपॉक्सची लागण झालेल्या काही लोकांमध्ये ही दोन नवीन लक्षणं आढळून आली आहेत. ब्रिटनमध्ये 179 रुग्णांच्या चाचण्यांमध्ये झालेल्या काही रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळून आली आहेत.
ही दोन लक्षणं जर जाणवत असततील तर दुर्लक्ष करू नका असं आवाहन तज्ज्ञांनी दिलं आहे. मंकीपॉक्सचा धोका जगभरात वाढत आहे. भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत.
मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाने लैंगिक संबंध ठेवल्यास हा आजार वेगानं पसरण्याचा धोका आहे. मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांनी क्वारंटाइन राहाणं गरजेचं आहे. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेणंही गरजेचं आहे.