Monsoon Child Care Tips: पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना आमंत्रण देणारा असतो. पावसाळ्यात इतर कोणत्याही ऋतूच्या तुलनेत व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यामध्ये एकाच ठिकाणी पाणी साचते.  त्यामुळे डासांची पैदास जास्त प्रमाणात होते. शिवाय घाणीमुळे इतर व्हायरस,जंतू, किटाणू, बॅक्टरिया वाढायला लागतात. पावसाळ्यात  सामान्य फ्लू, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बहुतेक सौम्य किंवा तीव्र प्रमाणाता आढळून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना संसर्ग लगेच होण्याची शक्यता असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्दी आणि फ्लू


पावसाळ्यात सर्दी, फ्लू यांसारख्या हवेतून पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा धोका जास्त आहे. सौम्य ताप, खोकला, घसा खवखवणे, थकवा, अंगदुखी, नाक वाहणे ही त्याची सामान्य लक्षणे असू शकतात.


डेंग्यू-मलेरिया


पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते. त्यामुळे या काळात डास चावल्याने डेंग्यू-मलेरिया यासारखे आजार पसरतात. ताप, अंगदुखी, थंडी वाजणे आणि घाम येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. तर सकाळच्या वेळेत डास चावल्याने डेंग्यू होण्याची शक्यता असते. या रोगांशी लढण्यासाठी व्यक्तीने स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. पौष्टिक आहार घेणे आणि पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे.


बुरशीजन्य संसर्ग


पावसाळ्यात आर्द्रतेमुळे त्वचा ओलसर होते. त्यामुळे त्वचेवर धूळ आणि बॅक्टेरिया सहज चिकटतात. परिणामी बुरशीजन्य संसर्ग होतो. अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी योग्य स्वच्छता ठेवा, मुलांना ओले कपडे अजिबात घालू देऊ नका, शरीर शक्य तितके स्वच्छ आणि कोरडे ठेवा, आपले टॉवेल, कपडे कोणासोबतही शेअर करू नका.


लहान मुलांची अशी काळजी घ्या


  • मुलांच्या हाता पायाची नखं स्वच्छ ठेवा. तसेच वेळच्या वेळी नखं कापा. हात पाय वारंवार धुवा.

  • मुलांना पूर्ण कपडे घाला जेणेकरून डास किंवा किडे चावणार नाहीत. 

  • स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. मुलांना शक्यतो सुती कपडे घाला.

  • पावसाळ्यात फळे, भाज्या, दूध यांचे सेवन करा. 

  • मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा