मुंबई : मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाळ्यातील या आल्हाददायी, प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत असताना त्याच्या स्वागताची थोडी तयारीही करावी लागणार आहे. पाऊसाचा काही नेम नसतो. कधी बरसेल आणि कधी दडी मारून बसेल सांगता येत नाही. अशावेळी घरातून बाहेर पडताना बॅगेत या ५ गोष्टी अवश्य ठेवा. त्यामुळे  कोणत्याही त्रासाशिवाय मान्सूनचा पुरेपूर आनंद लूटता येईल. पाहुया कोणत्या आहेत या गोष्टी...


वाटरप्रूफ बॅग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक आलेल्या पावसामुळे बॅगेतील सामान भिजून खराब होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे वाटरप्रूफ बॅग असेल तर अचानक आलेल्या पावसातही तुम्ही बिनधास्त वावरू शकता.


वाटरप्रूफ फोन पाऊच


आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा साथी म्हणजे आपला मोबाईल फोन. स्वतःपेक्षा आपण त्याची जास्त काळजी घेतो. अशावेळी पावसापासून मोबईलचे संरक्षण करण्यासाठी वाटरप्रूफ मोबाईल पाऊच हवाच.


टिशू


पावसात भिजल्याने चिकचिकीत वाटते. त्याचबरोबर येणारा घाम अधिक हैराण करतो. अशावेळी टिशू तुमच्या मदतीला येतात. टिशूमुळे भिजलेले अंग तुम्ही साफ करू शकता. त्यामुळे तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल. ऑफिस, मिटिंगला पोहचेपर्यंत तुम्ही प्रेसेंटेबल राहू शकाल.


छत्री


पाऊस कधी येईल, याचा नेम नसल्याने छत्री सोबत बाळगणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे तुम्ही पावसातून सुरक्षितरीत्या घरी किंवा ऑफिसमध्ये पोहचू शकता. तर तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या छत्रीला बॅगेत अवश्य जागा द्या.


सॅनिटायजर


पावसाळा अनेक आजारांना, इंफेक्शनला आमंत्रण देतो. त्यामुळे स्वच्छतेची काळजी घेतलीच पाहिजे. त्यामुळे नेहमीच हात धुणे शक्य नसल्याने सॅनिटायजर आपली ही समस्या नक्कीच दूर करतो. सॅनिटायजरने झटपट हात स्वच्छ होतात आणि किटाणूही दूर राहतात.


महत्त्वाचे:


स्नॅपडीलसारख्या अनेक ऑनलाईन कंपन्या मान्सूनसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर ७०% डिस्काऊंट देत आहे. या स्टोरमध्ये तुम्हाला छत्री, रेनकोट, प्रोटेक्टिव्ह पाऊच, रुम फ्रेशनर्स आणि सोलर लाईट्स सारख्या महत्त्वाच्या गोष्टी योग्य किंमतीत मिळतील. याशिवाय एचडीएफसी बॅंकेच्या क्रेडीट आणि डेबिट कार्ड युजर्संना १०% पर्यंत अतिरिक्त इंस्टंट डिस्काऊंट मिळत आहे.